Zero Hour : विदर्भातल्या पाच मतदारसंघांत अर्ज दाखल; नितीन गडकरी, राजू पारवेंसह दिग्गजांनी भरला अर्ज
Zero Hour : विदर्भातल्या पाच मतदारसंघांत अर्ज दाखल; नितीन गडकरी, राजू पारवेंसह दिग्गजांनी भरला अर्ज
लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. या टप्प्यात विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, आणि भंडारा-गोंदिया हे पाच लोकसभा मतदारसंघ आहेत. या पाचही ठिकाणी उरलेल्या उमेदवारांनी आज अर्ज दाखल झाले. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत आज अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रफुल पटेलही उपस्थित होते. गडकरी यांंच्याविरोधात काँग्रेसच्या विकास ठाकरेंनी काल उमेदवारी दाखल केलीय. चंद्रपुरात काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांनी आज अर्ज दाखल केला. त्यांची लढत सुधीर मुनगंटीवार यांच्याशी होणार आहे. भंडारा गोंदिय़ात भाजपकडून सुनील मेंंढे यांनी तर काँग्रेसकडून प्रशांत पडोळेंनी अर्ज दाखल केले. भंडारा गोंदिय़ातच वंचितचे संजय केवटही रिंगणात आहेत. गडचिरोलीतून वंचितचे राजेश बेले यांनी आज अर्ज दाखल केला तर काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांनीही आज अर्ज दाखल केलाय. भाजपच्या अशोक नेतेंनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर रामटेकमध्ये शिवसेना उमेदवार राजू पारवे यांनीही आज अर्ज दाखल केला. १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील या पाच जागांसाठी मतदान होणार आहे.