Zero Hour : शरद पवारांचा बारामती दौरा, तालुक्यातील दुष्काळी गावांची केली पाहणी
Zero Hour : शरद पवारांचा बारामती दौरा, तालुक्यातील दुष्काळी गावांची केली पाहणी
खरं तर काँग्रेसचा भिवंडीचा वाद हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आहे. पण तिकडे पवार मात्र आज बारामती दौऱ्यावर होते, बारामती आणि पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांचा त्यांनी दौरा केला. पवारांनी ह्या दौर्यात त्यांना चाणाक्ष नेता का म्हटले जाते ह्याचे दर्शन करवले. कधी लोकांचे मुद्दे घेऊन, तर कधी आधीची जवळीक दर्शवत, कधी लोकांना मैत्रीपूर्ण सल्ला देत तर कधी भावनिक होऊन .... शरद पवारांनी ह्या पट्ट्यात लोकांना आपल्याकडे खेचण्याचा, म्हणजेच पर्यायाने सुप्रिया सुळेंकडे मतदार वळवण्यासाठी प्रयत्न केले. सुप्याकडे जाताना शेतीची पाहणी केली. उंडवडी कडेपठार गावात शरद पवारांवर जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. उंडवडी इथला कार्यक्रम आटोपूून सुप्याकडे जाताना वाटेत प्रत्येक गावात शरद पवारांचं जोरदार स्वागत केलं गेलं. या दौऱ्यात ठिकठिकाणी थांबून पवारांनी जिव्हाळा असणारी, जुनी-जाणती माणसांची खास भेट घेत मार्गक्रमण केले. "पाणी पाहिजे असेल तर घड्याळाला मतदान करा" असा दबाव टाकला जाईल अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली. त्यांचा रोख गेल्या लोकसभेला व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपकडे होता, ज्यात सुप्रिया सुळेंना मत द्यावी यासाठी अजितदादांनी काही गावकऱ्यांना पाण्यावरुन कथित धमकी दिली होती. अशा दबावाला बळी न पडण्याचं आवाहन हि शरद पवारांनी आपल्या भाषणात केलं.