Zero Hour : ठाकरे गटाची मुंबईतील संभाव्य मतदारांची यादी एबीपी 'माझा'च्या हाती
Zero Hour : ठाकरे गटाची मुंबईतील संभाव्य मतदारांची यादी एबीपी 'माझा'च्या हाती
पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उद्धव ठाकरे सांगलीत येऊ शकले नाहीत असं सांगत विश्वजीत कदमांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.. मात्र उद्धव ठाकरे आज दिवसभर मातोश्रीच्या बाहेर पडलेच नाहीत, तिथेच काही कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या भेटीगाठी झाल्या अशी माहिती आहे.. असो.. राहुल गांधी यांनी सांगलीची निवड का केली यावरुनही दिवसभर चर्चा रंगली.. लोकसभेत याच जागेवरुन शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमध्ये मोठा वाद झाला होता.. आणि उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उमेदवारासमोर काँग्रेसने बंडखोर विशाल पाटलांना उभा केलं होतं आणि निवडूनही आणलं होतं.. या मुद्द्यावरुन महायुतीतील शिवसेनेनं उबाठा शिवसेनेला खिजवण्याची संधी सोडली नाही.. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वाटाण्याच्या अक्षता लावल्या, ते अधोरेखित करण्यासाठीच राहुल गांधी सांगलीत आले होते अशी मांडणी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलीय.