Zero Hour : शिंदेंच्या बॅनर्सला 'दादां'चं वाकडं ? पोस्टर्सवरून कोण इन, कोण आऊट ?
Zero Hour : शिंदेंच्या बॅनर्सला 'दादां'चं वाकडं ? पोस्टर्सवरून कोण इन, कोण आऊट ?
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून जसा अजितदादांचा फोटो गायब झालाय.. तसंच दादांचा गड असलेल्या बारामतीतही, अजित पवारांचा बॅनर आज झाकण्यात आला... त्याचं झालं असं की, बारामतीत शिवसेनेकडून एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं.. तसंच या कार्यक्रमाला येण्याची विनंतीही अजित पवारांना करण्यात आली होती.. पण बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणपती मंडळांना भेट देणाऱ्या दादांनी, शिवसेनेच्या या फेस्टिवलकडे पाठ फिरवली.. अन् शिवसैनिकांचा संताप अनावर झाला.. मग काय? त्यांनी फेस्टिवलसाठी उभारलेल्या कमानीवर असलेल्या अजित पवारांच्या बॅनरवर काळं कापड टाकून आपला निषेध व्यक्त केला.. या प्रकारानंतर पोलिसांनी शिवसेना पुणे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरेंना ताब्यात घेतलं... शिवसेनेच्या या कृतीमुळे स्थानिक राष्ट्रवादी कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं... भिगवण चौकात जमलेल्या शेकडो समर्थकांनी, अजित पवारांच्या समर्थनात घोषणा देत.. दादांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला.. तसंच परिसरातील जेवरेंच्या फोटोचा बॅनरही फाडला... हा वाद वाढत असल्याचं पाहताच तात्काळ नगरपालिकेच्या वतीने हे वादग्रस्त बॅनर्स काढण्यात आले... अजित पवारांनी मात्र अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन करताना, वाद निर्माण करणाऱ्यांनाही सुनावलं...