Zero Hour : पुन्हा मनोज जरांंगे विरूद्ध छगन भुजबळ?
Zero Hour : पुन्हा मनोज जरांंगे विरूद्ध छगन भुजबळ? कधी उपोषणं.. तर कधी राज्यव्यापी दौरे.. कधी झंझावाती सभा... तर कधी थेट मुंबईवर मोर्चा... हे सगळं करुन झाल्यानंतरही हवंतसं मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही.. आणि म्हणूनच की काय... मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरलेत.. यावेळी त्यांनी मार्ग जरा वेगळा निवडलाय.. मनोज जरांगेंनी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातून शातंता यात्रेचं आयोजन केलं.. चार दिवसांपूर्वी शेकडो मराठा बांधवांच्या उपस्थितीत मनोज जरांगेंची शांतता यात्रा सुरु झाली... परभणी, नांदेड करत मनोज जरांगेंची शांतता रॅली आज लातूरमध्ये पोहोचली.. पण, आज नांदेडमधून रॅली लातूरच्या दिशेनं निघण्यापू्र्वी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला.. मराठ्यांविरोधात बोलण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मंत्री छगन भुजबळांना बळ दिलं असा आरोप मनोज जरांगेंनी केलाय... तोच आरोप आधी पाहुयात..