Zero Hour : लोकसभा निकालाची प्रतीक्षा ; महिला आणि युवा शक्तीची साथ कुणाला ?
Zero Hour : लोकसभा निकालाची प्रतीक्षा ; महिला आणि युवा शक्तीची साथ कुणाला ? नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करणार की भाजपला सत्तेतून खाली खेचत इंडि आघाडी धक्कादायक विजय नोंदवते हे उद्या ठरणार आहे. पण, या निकालाआधीच महाराष्ट्राच्या राजकारण पुन्हा भुकंप येतो की काय? अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.. चर्चा होती की, भाजप नेते प्रसाद लाड यांनी मातोश्री बंगल्यावर फोन करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी उद्धव ठाकरेंकडे वेळ मागितली.. अर्थात अनेक माध्यमांनी अशीच बातमी चालवली.. पण, एबीपी माझानं बातमीची सत्यता पडताळली.. थेट प्रसाद लाड यांनाच फोनचं वृत्त किती खरं.. किती खोटं हे विचारलं.. आणि प्रसाद लाड यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं.. की त्यांनी असा कोणताही फोन केला नाही.. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ मागितली नाही.. त्यामुळे वेगवेगळ्या वाहिन्यांनी केलेले फोनसंदर्भातले दावे खोटे ठरले.. आता वळुयात पुन्हा एकदा वळुयात लोकसभा निवडणुकीकडे... या निवडणुकीत चौंसष्ट कोटी वीस लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात एकतीस कोटी २० लाख महिला मतदारांचा समावेश आहे. आणि उद्याच्या निकालात याच महिला मतदारांचा निर्णायक वाटा असणार आहे. २०१४ आणि २०१९ साली मोदी सरकार सत्तेत येण्यात याच महिला शक्तीचा आणि युवा शक्तीचा मोठा वाटा होता. यावेळच्या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे यावेळी इंडि आघाडीने बहुतांश राज्यात महाराष्ट्राच्या पुण्यातील कसबा पॅटर्न राबवला.. म्हणजे भाजपसमोर एकास एक उमेदवार दिला.. त्याचा किती परिणाम होतो हे उद्या कळणार आहे. पण, त्याआधीच विरोधकांनी सावध आणि विरोधी भूमिका घ्यायला सुरुवात केलीय.. दिल्लीत काँग्रेसच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतली... तर इकडे राज्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटलांनी कार्यकर्त्यांनी पत्र लिहिलंय.. ज्यात जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना सावधान राहण्याचं आवाहन केलंय.. ते पत्र पाहणार आहोतच.. मात्र, त्याआधी पाहुयात आजचा प्रश्न...