एक्स्प्लोर

अचानक गाय आडवी आली, ड्रायव्हरने ब्रेक मारताच कार थेट कालव्यात कोसळली, एअर होस्टेसचा करुण अंत

Air Hostess Met a Tragic End : या अपघातात दोन मित्रांना किरकोळ दुखापत झाली. पोलिसांनी गाडी चालवणाऱ्या जयविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Air Hostess Met a Tragic End : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारसमोर अचानक गाय येताच ड्रायव्हरने ब्रेक मारल्याने थेट भोपाळमधील कोलार कालव्यात कोसळली. या अपघातात एअर इंडियाच्या एअर होस्टेस हर्षिता शर्मा (वय 21) यांचा मृत्यू झाला. ती तिच्या दोन मित्रांसोबत फिरायला गेली होती. गाडी चालवणारा मित्र जय म्हणाला की, अचानक एक गाय समोर आली आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना गाडी नियंत्रणाबाहेर गेली आणि कालव्यात पडली. हर्षिताला गंभीर अवस्थेत एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले, आज शुक्रवारी सकाळी हर्षिताचा मृत्यू झाला. या अपघातात दोन मित्रांना किरकोळ दुखापत झाली. पोलिसांनी गाडी चालवणाऱ्या जयविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर गुन्ह्यांच्या कलमांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 

भावाला सांगितले होते, मी माझ्या वाढदिवशी भोपाळला येईन 

एअर होस्टेस हर्षिताचे वडील प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, ती अनेकदा शहराबाहेर राहत असे. बुधवारी रात्री तिने तिच्या भावाला व्हॉट्सअॅपवर सांगितले होते की ती शुक्रवारी भोपाळला येत आहे. ती गुरुवारीच भोपाळला पोहोचली आहे हे आम्हाला माहीत नव्हते. ती मीनल रेसिडेन्सीजवळील एका हॉटेलमध्ये राहिली.

मित्रांनी मला फोनवर सांगितले ती रुग्णालयात 

हर्षिताची मैत्रिण शिवानीने फोन करून तिला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली तेव्हा कुटुंबाला अपघाताची माहिती मिळाली. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी सांगितले की हर्षिता ब्रेनडेड झाली आहे. शुक्रवारी सकाळी मृत घोषित करण्यात आले.

मित्र म्हणाला,  हर्षिताने मला एकत्र फिरायला बोलावले होते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री हर्षिता तिच्या मित्र सुजल आणि जयसोबत कोलार परिसरात कारमध्ये फिरत होती. जय गाडी चालवत होता. कोलारमधील होली क्रॉस स्कूलजवळील पुलावर एक गाय गाडीसमोर आली. वाचवण्याचा प्रयत्न करत असताना गाडी कालव्यात पडली. जय आणि सुजल यांनी हर्षिताला बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. जयने पोलिसांना सांगितले की तो आणि सुजल एमबीएचे विद्यार्थी आहेत आणि हर्षिताच्या फोनवरूनच ते तिला भेटायला आले होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Rupali Chakankar and Ashok Kharat: सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
Maharashtra ATS : पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे
पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे
PM Narendra Modi Australia : मेलबर्नमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख; म्हणाले, 'दहशतवादी तळांवरील स्फोटांचे जगभर पडसाद'
मेलबर्नमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख; म्हणाले, 'दहशतवादी तळांवरील स्फोटांचे जगभर पडसाद'
Rajya Sabha Election : भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Missing Link : एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन; एकनाथ शिंदेंची टिप्पणी
एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन : एकनाथ शिंदे
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Tiger Dart: वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
Eknath Shinde : पाणी की तरह ये दोस्ती हमारी कोई भी कोई कितना भी चाहे जुदा नही होंगे, एकनाथ शिंदेंचं देवेंद्र फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर शायरीतून भाष्य
हम वो नही जो दिल तोड देंगे, थाम कर हात फिर साथ छोड देंगे, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Jayant Patil: 'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
Kiran Lahamate: राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
Rupali Chakankar and Ashok Kharat: सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
Embed widget