Zero Hour : कोकण कुणाच्या पाठिशी ? उद्धव ठाकरे की नारायण राणे ?
Zero Hour : कोकण कुणाच्या पाठिशी ? उद्धव ठाकरे की नारायण राणे ? रत्नागिरी-सिधुदुर्ग मतदारसंघासाठी ठाकरेंनी विद्यमान खासदार विनायक राऊत यांनाच उमेदवारी दिलीय... तर महायुतीकडून शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत... तर भाजपकडून नारायण राणे शर्यतीत आहेत.. शिवसेनेचा खासदार असल्यानं, ही जागा त्यांनाच मिळावी अशी भूमिका शिंदेंचे नेते घेतायेत.. त्यातच किरण सामंत यांनी काल एक पोस्ट सोशल मीडियात केली.. त्यात त्यांनी जवळपास आपली उमेदवारी घोषित केली. ह्याचे पडसाद उमटले असावे ... कारण नागपुरात असलेल्या उदय सामंतांनी कोकणातील नेत्यांशी चर्चा केली.. आणि काही मिनिटातच किरण सामंतांनी सोशल मीडियातून ती पोस्ट डिलीट केली.. आता इथेच खेळ थांबला नाही ... तर तिकडे एक नवे पोस्टर व्हायरल झाले ... ते नारायण राणेंच्या समर्थनात ... आणि पोस्टर हे दिलीत झालेल्या पण व्हायरल झालेल्या किरण सामंतांच्या पोस्टला उत्तर देखोगे अपने आँखोंसे, आयेंगे हम लाखोंसे.. फिक्स खासदार असा मजकूर, कमळाचे चिन्ह आणि नारायण राणेंचा फोटो होता.. नारायण राणेंनी आज सिधुदुर्ग, कुडाळमध्ये संघटनात्मक आढावा बैठका घेतल्या.. कार्यकर्ते मेळावे घेतले... त्यानंतर त्यांची आणि उदय सामंत यांची एक गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे.. त्याच बैठकीत रत्नागिरीवरुन चर्चाही झाली मात्र, त्यानंतरही उदय सामंतांनी मतदारसंघावरचा दावा सोडला नाही.. तर तिकडे नारायण राणेंनी आपल्या कार्यकर्ता मेळाव्यात... रत्नागिरी-सिधुदुर्गाचा खासदार भाजपाचाच होणार असं जाहीर केलं.. महायुतीतील याच सत्तासंघर्षावर ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी चांगलीच टोलेबाजी केली.. पाहुयात..