Zero Hour Bhujbal Pawar Meet : छगन भुजबळ महायुतीत नाराज आहेत का ? दादांना न सांगता शरद पवारांची भेट
Zero Hour Bhujbal Pawar Meet : छगन भुजबळ महायुतीत नाराज आहेत का ? दादांना न सांगता शरद पवारांची भेट मुंबईत सूर्यनारायणाचं दर्शन व्हायचं होतं.. कारण, विकेंडपासून सुरु असलेल्या पावसाचा खेळ आजही सुरु होता.. मुंबईकरही नेहमीप्रमाणेच कामावर पोहोचत होता.. आणि अचानक... राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यासमोर एका मंत्र्याचा ताफा उभा राहिला... तो ताफा होता.. मंत्री छगन भुजबळ यांचा... अर्थात ही दृश्यं पाहून तिथं उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींनाही धक्का बसला.. त्याला दोन कारणं.. पहिलं कारण.. अवघ्या काही तासांपूर्वी पवारांच्या बारामतीतच भुजबळांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जोरदार टीका केली होती.. सर्वपक्षीय बैठकीला विरोधक न येण्यामागे खुद्द शरद पवार जबाबदार आहेत.. असाही त्यांनी आरोप केला होता.. आणि त्यानंतर चोविस तासांच्या आत भुजबळ सिल्व्हर ओकवर पोहोचले.. त्यामुळेही हे अनपेक्षित होतं.. आणि दुसरं कारण म्हणजे....कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय.. किंवा सिल्व्हर ओकमध्ये कोणत्याही अपॉईंमेटंशिवाय... भुजबळांनी पोहोचणं.. हे सगळ्यासाठीच धक्का देणारं होतं.. खुद्द सुप्रिया सुळेंनाही या भेटीविषयी कल्पना नव्हती.. साडे दहा वाजता भुजबळ सिल्व्हर ओकवर पोहोचले.. जवळपास तासभर वेटिंगवर होते.. आणि अखेर तासाभरानंतर छगन भुजबळांची शरद पवारांसोबत भेट झाली... तिकडे दोघांमध्ये चर्चा सुरु झाली होती.. आणि इकडे महाराष्ट्रात राजकीय वादळ धडकलं होतं.. छगन भुजबळांनी आपल्या आजच्या दौऱ्याविषयी कल्पना कुणालाच दिली नव्हती.. त्यामुळे त्यांच्या पक्षासोबतच मित्रपक्षांनाही भेटीत काय सुरु आहे.. याची कल्पना लावणं शक्य होतं नव्हतं.. अंदाज बांधले जावू लागले.. आणि दुपारी साडेबारानंतर छगन भुजबळ सिल्व्हर ओकवरुन बाहेर पडले.. त्यानंतर थेट आपल्या कार्यालयात पोहोचले.. अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.. आणि भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली.. यावर पडदा टाकला.. ते पाहणार आहोतच.. मात्र, माध्यमांशी संवाद साधत असतानाच भुजबळांनी एक महत्वाचं वक्तव्य केलंय.. ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.. ते पाहुयात..