Zero Hour Guest Centre Ankush Kakde : शरद पवार 'हात' धरणार? प्लॅनिंग नेमकं काय?
मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या आणखी जवळ जातील, तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) या वक्तव्यामुळे आगामी काळात विरोधकांच्या गोटातील काही पक्षांची पुर्नरचना होण्याचे संकेत मिळत आहेत. शरद पवार यांनी 'द इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केले. या मुलाखतीत शरद पवार यांनी म्हटले की, पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील, असा अंदाज शरद पवार यांनी वर्तवला. मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरचचंद्र पवार पार्टी या पक्षासाठी लागू होईल का, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. यावर पवार यांनी सांगितले की, मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोणताही फरक दिसत नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरुंची विचारसरणी मानणारे आहोत, असे शरद पवार यांनी म्हटले.