Zero Hour ABP majha : काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांसमोर कसा गेला ? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Zero Hour ABP majha : काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांसमोर कसा गेला ? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा भारत स्वतंत्र झाला तेव्हाची राजकीय, भौगौलिक, जागतिक परिस्थिती वेगळी होती. आधी अनेक शतकं इस्लामी राजवट आणि नंतर दीडशे-दोनशे वर्षांचं ब्रिटिश राज, अशा पारतंत्र्याच्या जोखडातून हा देश मुक्त झाला होता.. ३० कोटी पोटांची भूक भागवायची भ्रांत होती.. त्यात फाळणीची मोठी जखम, त्यात लागोपाठ लादल्या गेलेली युद्धं...आव्हानं मोठी होती. त्यावेळी पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी काही निर्णय घेतले ज्यामुळे हा देश हळुहळू प्रगतीच्या वाटेवर यायला मदत झाली, ही गोष्ट मान्य करायला हवी... पंतप्रधान म्हणून त्यांना १७ वर्षांचा भलामोठा कालखंड मिळाला, या काळात त्यांच्या काही निर्णयांना हवं तसं यश मिळालं नाही हे सुद्धा मान्य करायला कोणाची हरकत नसेल. इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती टाळणं, त्यातून शिकत पुढे जात राहाणं हे पुढारलेल्या समाजाची, प्रगतशील देशाचं लक्षणं... जुन्या ऐतिहासिक चुका, historical blunders दुरुस्त करण्याचा प्रयत्न मोदी सरकार गेली दहा वर्ष करत आहे. त्याचं सुद्धा आपण स्वागत करायला हवं. या सगळ्याच नेत्यांच्या हेतूबद्दल शंका घ्यायला फारशी जागा नाही हे सत्य सुद्धा आपण मान्य करायला हवं. या सगळ्या गोष्टींकडे अधिक डोळसपणे पाहायची गरज आहे एवढं नक्की. आपला नेता महान आहे, महापुरुष आहे, तो चुकुच शकत नाही, त्याला तुम्ही काही बोलूच शकत नाही अशी परिस्थिती एकंदरीतच देशाच्या राजकारणात निर्माण झाली आहे. असं वाटणाऱ्यांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य लिहून ठेवलं आहे. "धर्मात भक्ती हा मोक्षाचा मार्ग असू शकतो पण राजकारणात नेत्याची भक्ती किंवा व्यक्तिपूजा हा अधोगतीकडे आणि शेवटी हुकूमशाहीकडे जाण्याचा हमखास मार्ग आहे." असं बाबासाहेब म्हणाले होते. In Politics.. Bhakti or hero-worship, is a sure road to degradation and to eventual dictatorship.. बाबासाहेबांच्या या वाक्याचा अर्थ मतदार, कार्यकर्ते, जनता म्हणून आपण आणि आपले प्रतिनिधी म्हणून सर्व राजकारण्यांनी समजून घेतला तर आजच्या महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.