एक्स्प्लोर
Voter List Fraud Zero Hour : 'एकाच घरावर 150 मतदार', अजित नवलेंनी निवडणूक आयोगासमोर पुरावे मांडले
मतदार यादीतील (Voter List) गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी निवडणूक आयोगाची (Election Commission) भेट घेतली. या बैठकीत बोलताना माकपचे नेते अजित नवले (Ajit Navale) यांनी गंभीर आरोप केले, 'एकाच घरावर शंभर दीडशे लोकांच्या नोंदण्या झाल्याचे पुरावे आपण सादर केलेले आहेत,' असे ते म्हणाले. शिष्टमंडळाने मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट नावे, चुकीचे फोटो आणि पत्त्यांमध्ये गोंधळ असल्याचे पुरावे सादर केले. सुमारे दीड तास चाललेल्या या चर्चेनंतर, केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील मुद्द्यांवरून उद्या पुन्हा एकदा दोन्ही आयोगांच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेण्याचे ठरले आहे. सदोष याद्या दुरुस्त केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केली आहे.
All Shows
झीरो अवर

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा

Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप

Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?

Zero Hour Full BMC Election : मुंबईत पुन्हा मराठी-अमराठी वाद? मतांच्या ध्रुवीकरणाला खतपाणी?

Zero Hour Full : राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी शरद पवार सकारात्मक, काँग्रेस तयार होईल? 21 Nov 2025
Advertisement
Advertisement




























