Yavatmal Doctor Death : महाविद्यालयात डॉक्टरची हत्या, वादातून कॉलेबाहेरील तरुणांनी घेतला जीव
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अशोक पाल या विद्यार्थ्याची वादातून हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आहे. मूळचा ठाणे जिल्ह्यातील असलेल्या आणि एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या अशोक पाल या विद्यार्थ्याची यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात रात्री हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. जन्माष्टमीच्या काळात बाहेरची काही मुलं कॅम्पसमध्ये सेलिब्रेशनसाठी आली होती. त्यातील दोघांचा अशोक पाल याच्याशी वाद झाला होता आणि त्यातून डॉक्टरनं या मुलांना मारहाण केली होती. यातूनच हत्या झाली असावी असं अशोक पाल याच्या मित्रांचं म्हणणं आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांनी याची कबुली दिलेली नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
All Shows

































