Mumbai Local : दोन डोस घेतलेल्या नागरिकांना परवानगी मिळणार? 70 टक्के लसीकरणानंतर लोकल सुरू?
जोपर्यंत 70 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत लोकलमध्ये प्रवेश देता येणार नाही असे मत व्यक्त केले आहे राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय टास्क फोर्स चे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी. 70 टक्के मुंबई आणि आसपासच्या शहरातील लोकांचे लसीकरण झाल्यानंतर देखील ज्यांचे दोन्ही दोष पूर्ण झाले आहेत आणि पंधरा दिवस उलटून गेले आहेत त्यांनाच सर्टिफिकेट पाहून लोकलमध्ये प्रवेश देता येईल असे डॉक्टर पंडित यांनी सांगितले आहे. इतर राज्यांच्या तुलनेत अजूनही महाराष्ट्रातील दुसरी लाट आलेली नाही. मुंबईत अजूनही तीन आकडी रुग्ण संख्या रोज बघायला मिळत आहे. तसेच लोकलमध्ये दोन्ही डोस पूर्ण झालेल्या प्रवाशांना जरी सोडायचे झाले तरी प्रशासकीय पातळीवर हे खूप कठीण काम असल्याचे मत डॉक्टर पंडित यांनी व्यक्त केले आहे. जगभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण पूर्ण झाल्याने तेथील निर्बंध थोडे शिथिल करण्यात आलेले आहेत. मात्र आपल्या इथे त्यासाठी वेळ लागेल त्यामुळे सर्व नियमांचे पालन करून प्रवाशांनी थोडा वेळ वाट बघायला हवी असे हे डॉक्टर पंडित यांनी सांगितले.