Sharad Pawar Special Report : शरद पवारांच्या राजकीय खेळींचा आढावा, पवार आणि धक्कातंत्र
राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय आपण पक्षाच्या भवितव्यासाठीच घेतल्याचं दस्तुरखुद्द शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं. गेल्या तीन दिवसांपासून यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पवारांनी हे स्पष्टीकरण दिलं. शरद पवारांच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता पाहायला मिळाली. नेते आणि पदाधिकाऱ्यांचं राजीनामासत्र सुरु झालं. पुण्यातील एका कार्यकर्त्यानं तर आपल्या रक्तानं पवारांना पत्र लिहून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. या भावना लक्षात घेऊन शरद पवारांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्षातल्या लोकांच्या तीव्र भावना मला दिसत आहे, पण मी हा निर्णय पक्षाच्या भवितव्यासाठी आणि नवं नेतृत्व तयार व्हावं यासाठी घेत असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं.