एक्स्प्लोर

Sangli Flood : महापुरातली लगीनगाठ! घोडा नको, गाडी नको... थेट बोटीतून वरात Viral Video

सांगली शहराला गेल्या चार दिवसांपासून महापुराचा विळखा बसलाय. जवळपास निम्मे शहर पाण्याखाली गेले आहे. एकीकडे आपल्या कुटुंबाची चिंता पूरग्रस्त सांगलीकरांना लागलेली असतानाच हौसेला काही मोल नसतं असाच प्रकार सांगलीमध्ये पाहायला मिळाला आहे.  महापुराच्या पाण्यातूनच नवदाम्पत्य बोटीने घरी पोहोचत गृहप्रवेश केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सांगलीतील गावभागामध्ये राहणारा आणि हरभट रोडला स्वत:चे सलून असलेला  सलून व्यावसायिक तरुण रोहित सूर्यवंशीचे अचानक लग्न ठरलं. मुहूर्त मेढ रोवली त्या दिवशी देखील पूरपरिस्थिती येणार असं वातावरण होतं. पण आता लग्न कसे रद्द करायचे म्हणून गड्याने आणि त्याच्या कुटुंबाने एका छोट्या मंगल कार्यालयात शासकीय परवानगी घेऊन 25  लोकांच्या साक्षीने लग्न उरकले. सगळे फोटोसेशन झले. वधू सासरी निघाली आणि कळाले की कृष्णा नदीची पातळी  वाढली आहे. त्यामुळे वधूला बोटीनेच घरी जावे लागणार आहे. 

गावात उंचावर आणि अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर रोहित राहत होता. त्यामुळे तिथे पाणी जायचा काही प्रश्न नव्हता.  प्रश्न होता तो वधू-वराने घरी कसे जायचे? वधू सासरी कशी जाणार? गृहप्रवेश कसा होणार? रीतिरिवाजा नुसार नववधूला सासरी नेऊन गृहप्रवेश तरी करायला हवा.मग काय ठरलं. बोटीने ही जोडी गावामधील घराकडे जाऊ लागली. फौजदार गल्लीत ही नवविवाहित जोडी बसली आणि घराकडे येता येता  मारुती चौक लागला. बोटवाला म्हणाला, पडा बोटीतूनच पाया. मग ही जोड मारुती चौकातील मारुतीरायाला बोटीतूनच पाया पडले आणि घराकडे गेली.  

गावभागमध्ये जाताना सगळीकडे अपार्टमेंटच्या खाली पाणी होते. मग पाण्यातुनच वाट काढत या जोडीचे स्वागत आणि वधूचा गृहप्रवेश झला. बोटीत बसल्यानंतर काही तरूणांनी या दाम्पत्याचे फोटो, व्हिडीओ काढले. सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड व्हायरल झाले. पुरात बोटींतून वाट काढत गृहप्रवेश केलेली जोडी म्हणून जोडी हिट झाली. पण सोशल मीडियावर काही मंडळीनी या जोडीने प्रसिद्धीसाठी बोटीतुन प्रवास केला, मुद्दाम देवदर्शन केले अशा कमेंट केल्या.पण रोहितने यावर स्पष्टीकरणं दिले आहे. तो म्हणाला, "हे व्हिडीओ आम्ही नाही तर बोटींतून येत असणाऱ्या काही तरुणांनी काढले आहे. तसेच आम्ही गावभागात अशा ठिकाणी आणि फ्लॅटमध्ये तिसऱ्या मजल्यावर  राहतो. जिथे कधीच पाणी येत नसल्याने आम्ही  लग्न उरकल्यानंतर बोटीने घरी जण्याचा निर्णय घेतला. यात ना स्टंटगिरी होती ना नियम मोडले, अशी भावनाही जोडप्याने व्यक्त केली.

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
Embed widget