एक्स्प्लोर

Eknath Shinde Thane Fire: ठाण्यातील इमारतीला भीषण आग लागली, एकनाथ शिंदे बॅटरी घेऊन आत शिरले, फायरब्रिगेडच्या जवानांना विचारलं, 'तो पोरगा यंग आहे ना?'

Eknath Shinde Thane Fire: “खालून आपली लोकं वर गेलेयत ना, आता कुठे धूर नाही ना?” आग लागल्यानंतर एकनाथ शिंदे ऑन फिल्ड उतरले, इमारतीमध्ये जाऊन काय केलं?

Eknath Shinde Thane Fire: राज्यभरात रविवारी लक्ष्मीपूजनाचा सोहळा साजरा होत असताना अनेक ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनांमुळे दिवाळीच्या सणाला गालबोट लागले. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील एका बहुमजली इमारतीला रविवारी रात्री आग (Fire news) लागली. ही आग भीषण होती. नवव्या मजल्यावर लागलेली ही आग काही क्षणांमध्ये 17 व्या मजल्यापर्यंत पसरत गेली. त्यामुळे या इमारतीमधील अनेक रहिवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, अग्निशमन दलाच्या वेगवान हालचालींमुळे कोणतीही जीवितहानी  झाली नाही. वागळे इस्टेट येथील रहेजा गार्डन संकुलातील 'कार्लाइन' या 17 मजली इमारतीला रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीची भीषणता लक्षात येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी तातडीने याठिकाणी धाव घेतली. (Thane Fire news)

अग्निशमन दलाकडून आग विझवली जात असताना एकनाथ शिंदे हे आपल्या काही मोजक्या सहकाऱ्यांसह रहेजा गार्डन कॉम्प्लेक्समध्ये दाखल झाले. एकनाथ शिंदे हे या इमारतीच्या परिसरात पोहोचले तेव्हा अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षेच्या कारणास्तव  या परिसरातील वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे हे एक मोठी बॅटरी हातात घेऊन इमारतीच्या आतमध्ये शिरले. एकनाथ शिंदे हे इमारतीच्या पार्किंगच्या परिसरात पोहोचले तेव्हा तिथे अग्निशमन दलाचे जवान उभे होते. एकनाथ शिंदे यांनी या जवानांकडे आग कशी लागली आणि बचावकार्य कसे सुरु आहे, याबद्दल विचारपूस केली. त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी एक व्यक्ती वरच्या मजल्यावर अडकल्याचे सांगितले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी, 'तो पोरगा यंग आहे ना?', असे जवानांना विचारले. त्यावर अग्निशमन दलाच्या जवानांनी या तरुणाला व्हीलचेअरवरुन खाली आणले जात असल्याची माहिती दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आता इमारतीमध्ये धूर आहे का, आपली टीम वर पोहोचली आहे का, असे प्रश्नही फायरब्रिगेडच्या जवानांना विचारले. 

रहेजा गार्डन संकुलातील 'कार्लाय' इमारतीमध्ये आग लागल्याची वर्दी मिळाल्यानंतर ठाणे व मुंबई परिसरातील अग्निशमन दलाच्या 10 ते 15 गाड्या याठिकाणी दाखल झाल्या. सहा तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये  इमारतीत अडकलेल्या 50 हून अधिक रहिवाशांसह पाळीव प्राण्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, या सगळ्यात काहीजणांना दुखापत झाली आहे. या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही आग नवव्या मजल्यावरुन 17व्या मजल्यापर्यंत पसरत गेली. या सगळ्या मजल्यावरील फ्लॅटसमधील साहित्य जळून खाक झाले आहे. या दुर्घटनेनंतर ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाणे जिल्ह्यात रॉकेट आणि हवेत आतिशबाजी करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. इतर फटाके केवळ खुल्या मैदानातच फोडण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

ही आग नक्की फटाक्यामुळे लागली का शॉर्ट सर्किटमुळे लागली याचा शोध प्रशासनाने सुरू केला आहे. मात्र वेळीच मदत मिळाल्याने आणि ठाणे अग्निशमन दल आणि टीडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने कोणताही अनुचित प्रकार न घडता ही आग आटोक्यात आणता येणे शक्य झाले. या बचावकार्यात अग्निशमन पथकाने अत्याधुनिक ड्रोनचा वापर केल्यामुळे रहिवाशी नक्की कोणत्या मजल्यावर अडकून पडले आहेत ते शोधणे शक्य झाल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. वेळीच मदतीला धावून येत नागरिकांना सुखरूप सुटका केल्याबद्दल रहेजा गार्डन मधील रहिवाशांनी उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. 

आणखी वाचा

Thane Mumbai Fire Marathi News: अंधेरी, डोंगरी, विद्याविहार, चेंबूरसह ठाण्यात दिवाळीला गालबोट; आगीच्या घटनेनं मुंबई हादरली, ठाण्यात रॉकेटवर आजपासून बंदी

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माझा भाऊ मंत्री होऊ दे, भाऊबीजनिमित्त सुषमा अंधारेंच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा, म्हणाल्या, परळीला सत्ताकेंद्र असण्याची सवय
माझा भाऊ मंत्री होऊ दे, भाऊबीजनिमित्त सुषमा अंधारेंच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा, म्हणाल्या, परळीला सत्ताकेंद्र असण्याची सवय
अजित पवार महायुती सोडणार होते, अतुल लोढेंचं मोठं वक्तव्य, उमेश पाटील म्हणाले दाव्याचा ठोस पुरावा नेमका काय? 
अजित पवार महायुती सोडणार होते, अतुल लोढेंचं मोठं वक्तव्य, उमेश पाटील म्हणाले दाव्याचा ठोस पुरावा नेमका काय? 
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा, सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर तटकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा, सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर तटकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर, मुद्रा योजनेसाठी 5000 कोटींना मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
Embed widget