26/11 Attacks Maha Politics Special Report : करकरेंचा मृत्यू कुणाच्या गोळीमुळे? कसाब की...
कोल्हापूर: मुंबईवरील 2611 हल्ल्याच्यावेळी शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. या वक्तव्यावरुन गदारोळ निर्माण होताच विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती, हे माझे वक्तव्य एस.एम. मुश्रीफ यांनी लिहलेल्या पुस्तकाच्या आधारे केले होते. त्यामध्ये तसा उल्लेख होता. ती गोष्ट खरी असेल तर हा देशद्रोहाचा प्रकार आहे, असे मी म्हटल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ते रविवारी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
All Shows

































