India Chainभारताच्या दृष्टीनं चीन प्रमुख शत्रू,अमेरिका डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी अहवालSpecial Report
अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीने त्यांच्या सरकारला एक अहवाल सादर केला. जगात कुठे काय सुरु आहे, त्याचा अमेरिकेवर काय परिणाम होणार याचं विश्लेषण अशा अहवालात केलं जातं. त्यात भारत पाकिस्तानचे ताणलेले संबंध, ७ ते १० मे या काळात झालेले युद्ध, चीनची पाकिस्तानवर होणारी लष्करी आणि आर्थिक मदतीची खैरात, अशा गोष्टींचा उल्लेख केला आहे. भारत चीनला मुख्य प्रतिस्पर्धी मानतो हे सुद्धा त्या अहवालात म्हंटलंय.पाहुयात हा रिपोर्ट
भारताच्या दृष्टीनं चीनच प्रमुख शत्रू आहे,
चीनच्या तुलनेत पाकिस्तान दुय्यम समस्या आहे असं भारत मानतो, हे निरीक्षण नोंदवलं आहे अमेरिकेतील डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीच्या ताज्या अहवालात..
या अहवालात पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीचा उल्लेखही करण्यात आलाय.
जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यावर आणि भारताची लष्करी ताकद वाढवण्यावर पंतप्रधान मोदींचा भर राहील असं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं आहे.
चीनच्या आर्थिक आणि मिलिटरी खैरातीवर पाकिस्तान तगून राहिल आणि चीनच्या जोरावर आपला भारताविरोध कायम राखेल असंही अहवालात म्हंटलं आहे.
प्रत्येक खंडातील, प्रत्येक देशाची संरक्षण सज्जता कशी आहे, शेजारी देशांशी संबंध कसे आहेत, त्याचा अमेरिकेवर काय परिणाम होईल याचा बारकाईने अभ्यास केलेला या अहवालातून दिसून येतं.
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























