एक्स्प्लोर
Raj-Uddhav Thackeray Special Report : दसऱ्याला ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब होणार?
दसरा हा वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी तिसरा मुहूर्त मानला जातो. या मुहूर्तावर Raj Thackeray आणि Uddhav Thackeray यांच्या राजकीय जुळवाजुळवीचं पुढचं पाऊल पडणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे. ठाकरे बंधू एकमेकांना वैचारिक सोन्याची आदानप्रदान करणार असल्याचं सूचक वक्तव्य ठाकरे पक्षांकडून होत आहे. मनसेचे नेते मात्र सध्यातरी यावर कानावर हात ठेवत आहेत. त्यामुळे युतीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी दसऱ्याचा मुहूर्त साधला जाणार की तो हुकणार, याची चर्चा सुरू आहे. खासदार Sanjay Raut यांनी "माननीय Uddhav Thackeray, माननीय Raj Thackeray हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत. अनेक दिशांवर चर्चा करतायत. एकमेकांशी संवाद साधताहत. विचारांची देवाणघेवाण करताहेत. दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदानप्रदान सुद्धा होऊ शकतं," असे म्हटले आहे. मनसे नेत्यांनी मात्र पक्षाकडून कोणतीही बातमी नसल्याचे सांगितले. यापूर्वी Raj Thackeray आणि Uddhav Thackeray यांनी त्रिभाषा सूत्र आणि मराठीच्या मुद्द्यावरून एकत्रित मेळावा घेतला होता. तसेच, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या वाढदिवशी भेट दिली होती आणि राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणपती दर्शनासाठीही गेले होते. दोन्ही पक्षांकडून Mumbai मध्ये आपलाच महापौर बसणार असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. भाजपने यावर टीका केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरे एकत्र येण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report

Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report

Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report

BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report

Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report




























