Special Report : विठ्ठल भक्तांकडून भरभरुन दान; खजिन्यात वाढ, ठेवण्याची पंचाईत ABP Majha
गोरगरिबांचा लोकदेव अशी ओळख असलेल्या विठुरायाच्या खजिनात गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांकडून अर्पण केलेल्या कोट्यवधी रुपयाच्या सोने चांदीच्या लहान लहान वस्तू पोत्यात बांधण्याची वेळ आलीय. या दागिन्यांच्या एकत्रीकरण करण्याचा निर्णय होऊन दोन वर्षे झाली तरी अजूनही विधी व न्याय विभाग याबाबत गंभीर झालेला नाही. त्यामुळं २८ किलो सोनं आणि ९९६ किलो चांदीच्या हजारो वस्तू पोत्यानिर्णत बांधून ठेवायची वेळ मंदिर समितीवर आलेली आहे. दोन वर्षांपूर्वी याबाबत मंदिर समितीनं या लहान लहान अर्पण केलेल्या वस्तू वितळवून सोने आणि चांदीच्या विटा करण्याचा य घेतला होता. तेव्हा विठुरायाच्या खजिन्यात या लहान वस्तूंमध्ये 3 किलो सोने आणि चांदी 166 किलो चांदीमध्ये वाढ झाली आहे. अजूनही याचा निर्णय झाला नाही, तर दुसरीकडे भाविकांकडून अर्पण होणाऱ्या वस्तूंमध्ये वाढ होत राहणार आहे.