Special Report : Sangram Thopate : काँग्रेसला रामराम, भाजपात 'संग्राम'! मात्र 'हात' का सोडला?
Special Report : Sangram Thopate : काँग्रेसला रामराम, भाजपात 'संग्राम'! मात्र 'हात' का सोडला?
गेली ४० वर्ष पुण्यातल्या भोर मतदारसंघावर थोपटे घराण्याचं वर्चस्व होतं. हे घराणं काँग्रेसशी एकनिष्ठ. काँग्रेसच्या तिकिटावर आधी अनंतराव थोपटे सहा वेळा तर त्यांचे सुपुत्र संग्राम थोपटे तीन वेळा आमदार झाले. पण आता संग्राम थोपटेंनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेण्याचा मोठा निर्णय घेतलाय. येत्या २२ एप्रिलला संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. पण इतकी वर्ष काँग्रेसची साथ दिल्यानंतर थोपटेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला? कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी कोणती खदखद बोलून दाखवली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
गेली ४० वर्ष भोर विधानसभा मतदारसंघावर
वर्चस्व असलेलं राजकीय घराणं म्हणजेच थोपटे घराणं....
पण दोन दिवसांपूर्वीच थोपटे यांनी
काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला...
आणि चांगल्या वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या भोरमधलं राजकीय वातावरण काहीसं गढूळ झालं...
काँग्रेसकडून सतत डावलण्यात आल्यानं ते नाराज होते
अखेर ही खदखद राजीनाम्याच्या रुपानं त्यांनी बाहेर काढली...
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























