Special Report Morris Noronha : फोटोचं कॅप्शन, हत्येचा प्लॅन, मॉरिसच्या बायकोच्या जबाबातून काय समोर?
Special Report Morris Noronha : फोटोचं कॅप्शन, हत्येचा प्लॅन, मॉरिसच्या बायकोच्या जबाबातून काय समोर?
पक्ष.. कार्यकर्ते.. निषेध.. घोषणाबाजी.. सत्ताधारी.. विरोधक.. ही लोकशाहीतल्या राजकारणाची व्याख्या.. आणि जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताची ख्याती.. पण याच भारतात सर्वात मोठ्या राज्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकारवर असलेल्या महाराष्ट्रात, अहिंसात्मक राजकारणाने हिंसेची चव चाखली की काय? असं वाटू लागलंय.. २ फेब्रुवारीला आधी कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाडांनी, शिवसेना शहर प्रमूख महेश गायकवाडवर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला.. सध्या महेश गायकवाड मृत्यूशी झुंज देतोय.. तर कालच, म्हणजे ८ फेब्रुवारीला अभिषेक घोसाळकरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.. तीही थेट फेसबुक लाईव्ह करत ... खरंच दहिसरमधल्या ह्या घटनेत नेमकं काय कारण होतं.. की हे हत्याकांड revenge murder होता.. हे कोडं उलगडणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहुयात..