Shiv Sena Split Thackeray vs Shinde:शिवसेनेतील ऐतिहासिक बंड;5 थरारक टप्प्यांचा प्रवास Special Report
एकूण अंतर ६ हजार ४८९ किलोमीटर... मुक्कामाची ठिकाणं ५... हा प्रवास फक्त महाराष्ट्रातील ४२ आमदारांचा नाहीय, तर हा थरारक प्रवास आहे महाराष्ट्रातील सर्वात उत्कंठावर्धक, सर्वात धक्कादायक आणि सर्वात ऐतिहासिक सत्तासंघर्षाचा... इथं महाराष्ट्रात, या भूकंपामुळे राजकीय मैदान हादरून गेलं होतं... सर्वपक्षीय नेत्यांना धक्क्यांवर धक्के बसत होते आणि उद्धव ठाकरेंसोबत उरलेल्यांना घाम फुटला होता... आणि ही अत्यंत धाडसी करामत केली होती... एकनाथ संभाजीराव शिंदे यांनी... महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतरच्या ६३ वर्षांत कधी पाहिलं नसेल, कधी ऐकलं नसेल... असं थरारक बंड केलं... महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, अवघ्या चार वर्षांनी जन्माला आलेल्या एकनाथ शिंदेंनी... आणि त्यामुळे ठाकरेंची खुर्ची गेली... महाविकास आघाडीचं सरकार धाडकन् कोसळलं... मात्र, या भूकंपाची सुरूवात झाली तो दिवस होता २० जून २०२२... अर्थात आजचाच दिवस... याच भूकंपाची वर्षपूर्ती आज होतीय... म्हणूनच... मुंबई ते सुरत, सुरत ते गुवाहाटी, गुवाहाटी ते गोवा आणि गोवा ते पुन्हा मुंबई... या पाच मुक्कामांच्या थरारक प्रवासाच्या पाच फाईल्स.... आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत... जशा घडल्या तशा... यातली प्रत्येक फाईल, प्रत्येक फाईलमधलं प्रत्येक पान आणि प्रत्येक पानावरचं प्रत्येक अक्षर... या हायव्होल्टेज ड्राम्याचे करंट आणि अंडरकरंट तुम्हाला दाखवतील... पाहूयात... द सरकार फाईल्स... गेल्या वर्षी याच दिवशी...