Sharad Pawar And Ajit Pawar : एकीकरणाचा प्रश्न 'माहीत नाही'चं उत्तर; शरद पवारांचं खास त्यांच्या शैलीत विधान Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar : एकीकरणाचा प्रश्न 'माहीत नाही'चं उत्तर; शरद पवारांचं खास त्यांच्या शैलीत विधान Special Report
शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार का? कधी येणार? या प्रश्नाचं उत्तर कोणाला माहित असेल? तुम्ही म्हणाल एक तर शरद पवारांना किंवा अजित पवारांना.. पण शरद पवारांनाही या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही असं आम्ही सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवाल? पण ते खरंय कारण असं दुसरं तिसरं कोणी नाही तर दस्तुरखुद्द शरद पवारांनी बारामतीत सांगितलंय. काय घडलं पाहुयात
सध्या राज्यात सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे पवार काका पुतण्या एकत्र येणार का? दोन्ही राष्ट्रवादी एक होणार का? आणि हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे विधानसभा निकालाच्या १०० दिवसानंतर बदलत जाणारी राजकीय परिस्थिती, शरद पवार आणि अजित पवारांमधला निवळत जाणारा तणाव आणि गेल्या काही दिवसात शरद पवारांनी विलिनीकरणाचे दिलेले संकेत.
त्यामुळे शरद पवार जेव्हा बारामतीत पोहोचले तेव्हा त्यांना याच विषयावर प्रश्न विचारला गेला. पवारांनी नेहेमीप्रमाणे टिपिकल पवार स्टाईल उत्तर दिलं.
आता शरद पवारच जर मला माहित नाही असं म्हणत असतील तर तिथे इतरांची काय कथा.
काहीशी तशीच अवस्था झाली छोटे दादा रोहित पवार यांची.
२ विंडो BITE - रोहित पवार
((पवार साहेब जर म्हणत असतील मला माहीत नाही तर मी अस म्हटल पाहिजे मला समजत नाही .सुप्रिया ताई जोवर या विषयावर बोलत नाहीत तोवर आम्हीही काही बोलू शकत नाही
सुप्रिया ताई काय भूमिका घेतात हे पहावं लागेल
पवार साहेब एखाद्या गोष्टीवर बोलतात ते प्रत्यक्षात वेगळ असत
+
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का जसा प्रश्न तुम्हाला पडला आहे तसा अनेकांना पडला आहे मात्र आजपर्यंत फक्त ही चर्चा आहे वरिष्ठ पातळीवर सर्व आमदारांना घेऊन सुप्रियाताई,शरद पवार,जयंत पाटील आम्हाला कुठेही काही सांगितले नाही जर आम्हाला काही कळालं तर आम्ही म्हणजे समोरून नक्की येऊन सांगू.सगळ्यात जास्त मी सरकार वर टीका केली आहे. ))
VO
सत्ताधारी भाजपकडून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सुद्धा हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे असं साच्यातलं उत्तर दिलं आणि अजून एकत्रीकरणाची चर्चा नाही अशी आपली माहिती आहे अशी पुस्तीही जोडली.
BITE - चंद्रशेखर बावनकुळे
((माझी माहिती अशी आहे की अजून एकत्रीकरण ची काही चर्चा नाही.. जसं तटकरे बोलले... जी चर्चा सुरू नाही, त्या विषयावर टीका टिप्पणी करणे योग्य नाही.. कोणी संभ्रम तयार करत आहे?? दरम्यान हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, राष्ट्रवादीच्या एकूणच विलनीकरणाची चर्चा नाही.. मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे माझी पण काही माहिती आहे माझे माहितीप्रमाणे अशी कुठलीही चर्चा सध्या सुरू नाही..))
पवार भाजपच्या जवळ जातायत या शंकेनं महाविकास आघाडीमध्ये मात्र रोज छोटे मोठे भूकंप सुरु आहेत.
तुम्ही गेले काही एक दोन आठवडे रोज सकाळी बातम्या पाहात असाल तर शरद पवारांच्या बदललेल्या भूमिकेचा सर्वात जास्त त्रास संजय राऊत यांना होतोय हे तुम्हाला जाणवलं असेल.
तहान लागली म्हणून कोणी गढूळ पाणी पित नाही अशा शब्दात त्यांनी पवार आणि भाजपबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर राऊतांनी काल दिलं होतं तर आज शाहु फुले आंबेडकरांच्या वारस्याची आठवण शरद पवारांना करुन दिली. काँग्रेसने मात्र विषय झटकून टाकला.
((दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील या चर्चा सध्या हवेत आहेत..
शरद पवार हे महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांचा वारसा घेऊन पुढे चालत फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेला त्यांचा पक्ष आहे
त्यामुळे त्यांच्यासारखा आदर्श नेता धर्मांद्र आणि जाती शक्तीचा राज्यात वाढलेल्या या शक्तींबरोबर शरद पवार जातील असं त्यांच्या समर्थकांसह सहकाऱ्यांना वाटत नाही...))
+
BITE - वर्षा गायकवाड
((जर तर आम्ही उत्तर देणार नाही मी त्यांच्या पक्षाची प्रवक्ता नाही.))
VO
राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय शरद पवारांनी मागेच नव्या पिढीवर म्हणजे सुप्रिया सुळेंवर सोडला आहे. सुप्रियाताई गेली २००६ पासून दिल्लीत आहेत. म्हणजे जवळपास २० वर्ष राष्ट्रीय राजकारणात आहेत. राष्ट्रवादी एक झालीच तर महाराष्ट्रात दादा आणि दिल्लीत ताई हीच जुनी अरेंजमेंट पुन्हा पाहायला मिळू शकते.
फक्त तो दिवस कधी येणार किंवा येणार की नाही हे जिथे शरद पवारांना माहिती नाहीय तिथे आपली काय कथा. आपण फक्त जे जे होईल ते ते पाहायचं.
All Shows

































