Sanjay Raut on MVA : संजय राऊतांना 'लाडकी बहिणी'च्या नवऱ्याची चिंता, प्रकरण काय? Special Report
ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ म्हणजेच संजय राऊत. त्यांच्या निशाण्यावर रोज कुणी ना कुणी असतंच. आज होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार. राज्याची तिजोरी भरण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी, अर्थमंत्री अजित पवारांसमोर दारूच्या दुकानांचे परवाने वाढवण्यासंबंधी प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे. हाच धागा पकडून संजय राऊतांंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. लाडक्या बहिणींना सरकार पंधराशे रुपये देतंय. पण लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करण्याची दुसरी योजना सरकार आखतंय का असा सवाल राऊतांनी केलाय. पाहुयात यासंदर्भातला राजकीय शोलेचा हा स्पेशल
आता लाडकी बहीण योजनेतंर्गत मिळणारे पंधराशे रुपये आणि दारूडे नवरे यांचा काय संबंध?
असा प्रश्न तुम्हाला संजय राऊतांचं वक्तव्य ऐकून पडला असेल...
तर राऊतांच्या या टीकेचं मूळ कारण आहे, सरकारी तिजोरीतील गंगाजळी वाढवण्यासाठी विचाराधीन असलेल्या प्रस्तावावर..
राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे...
लाडकी बहीण आणि तत्सम योजनेतंर्गत पैसे वाटावे लागत असल्यानं तिजोरीवर भार आहे..
त्यामुळे सरकारी तिजोरीतली गंगाजळी वाढवण्यासाठी कुणी तरी शक्कल शोधून काढलीय
नेमक्या याच मुद्द्यावरुन राऊतांनी सरकारला धारेवर धरलं...
एकीकडे लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये द्यायचे
आणि दुसरीकडे त्यांच्या नवऱ्यांना दारुडे बनवायचं का?
असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय..