Raj Thackeray MNS : राज ठाकरे महायुतीत जाणार? ठाकरेंचा भविष्यातला 'राजमार्ग' कोणता? Special Report
राज ठाकरे... कधी सडेतोड बोलत विरोधकांची सालटं काढणारे नेते.. कधी मराठीच्या मुद्द्यावर रस्त्यांवर राडा घालणारे नेते... इतकंच नाही तर कधी उत्तर भारतीयांना चुचकारण्याचा प्रयत्न करणारं धोरणही त्यांनी राबवलं... गेल्या सुमारे दोन दशकांत राज ठाकरे वेगवेगळ्या माध्यमातून सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रतन्न करत राहिले... अर्थात त्यांना सत्तेच्या महाराणीने बहुतांश वेळा हुलकावणी दिली... आता मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय... पक्ष फुटले... घरदारं फुटली... सरकारं कोसळली आणि नवी सरकारं आली... या सगळ्या गदारोळात आता निवडणुकांचे ढोलही वाजू लागलेत. त्यामुळे राज ठाकरेंची मनसे आता कोणता राजकीय ठेका धरणार? असा प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत... पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट...
All Shows

































