Pandharpur : आषाढी यात्रेनंतर पंढरपूरमध्ये स्वच्छता अभियान, राज्यभरातून 100 वारकरी अभियानासाठी दाखल
आषाढी सोहळ्यानंतर आज सकाळी विश्व वारकरी संघाच्या वतीने पंढरपूर मध्ये तीर्थक्षेत्र स्वच्छता अभियान राबविण्यात आले . संघाचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ महाराज देशमुख आणि प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात नामदेव पायरी येथून करण्यात आली. आषाढीला यंदा मोजक्याच वारकर्यांना प्रवेश दिला असला तरी प्रत्येक यात्रेनंतर त्या गावाची सफाई करण्याचा उपक्रम विश्व वारकरी संघाकडून चालविला जातो. आज संत नामदेव यांच्या पुण्यतिथी निमित्त नामदेव पायरी पासून या अभियानाची सुरुवात झाली. मुंबई , पुणे , नाशिक , जालना , सांगली , कोलापूर सह राज्यभरातून 100 वारकरी या अभियानासाठी दाखल झाले होते. मंदिर परिसर , प्रदक्षिणा मार्ग आणि वाळवंट येथील स्वच्छता या वारकर्यांनी केली.
All Shows
































