Nawab Malik Special Report : मलिकांचे राजकीय नवाब कोण ?
Nawab Malik Special Report : मलिकांचे राजकीय नवाब कोण ? मनीलॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीच्या अटकेतून जामिनावर सुटलेले आमदार नवाब मलिक गेले काही महिने फारसे कुठे दिसले नाहीत. राज्य विधीमंडळाच्या नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनात मलिक सुटाबुटात अवतरले. त्यांनी मोठ्या रुबाबात विधानभवनात एन्ट्री घेऊन जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर त्यांनी बैठक मारली ती थेट सत्ताधाऱ्यांच्या बाकावर. त्यावरून काल दिवसभर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. आणि संध्याकाळी थेट एक पत्र आलं. देवेंद्र फडणवीसांचं. तेव्हापासून सत्ताधारी असो किंवा विरोधक... सगळ्यांनीच मलिकांच्या आसनाभोवती आरोपांचा पिंगा घातला. पाहूयात नवाब मलिकांवरून कसा संभ्रम आणि गुंता निर्माण झालाय ते स्पेशल रिपोर्टमधून.
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























