(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amravati Shivray Statue Special Report : राजापेठ उड्डाणपुलावरील शिवरायांचा पुतळा पुन्हा बसवणार?
Amravati News अमरावती : अमरावतीच्या (Amravati News) राजापेठ उड्डाणपुलावर आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी 11 जानेवारी 2022 च्या रात्री छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati shivaji maharaj) यांचा पुतळा स्थापन केला होता. मात्र तो पुतळा कुठलीही परवानगी न घेता बसविल्याने महानगरपालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने तो अनधिकृत पुतळा पोलीस बंदोबस्तात (Amravati Police)हटवला होता. त्यावरून पालिका प्रशासन आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात मोठा वाद निर्माण होऊन बरेच राजकारण तापले होते.
उद्या 19 फेब्रुवारीला सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्याने, त्याच ठिकाणी परत एकदा शिवरायांचा पुतळा बसवला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तशी जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे. सोबतच, आज एकाच दिवसात उड्डाणपुलावर उंचवटा तयार करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्या उंचवट्या मागिले नेमके प्रयोजन काय हे जारी स्पष्ट नसले तरी शिवरायांच्यांच पुतळ्यासाठी ही लगबग सुरू असल्याचे बोलले जात आहे.