Maharashtra Temples Reopen : मंदिरांबाहेरील छोट्या व्यावसायिंकांना दिलासा Special Report
कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाच आता राज्य सरकारकडून (Maharashtra Govt) अनलॉकची (Unlock) प्रक्रिया सुरु केली जात आहे. राज्य सरकारकडून शाळा, धार्मिक स्थळे, चित्रपटगृहांसोब नाट्यगृहंही सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 4 ऑक्टोबरला शाळांची घंटा वाजणार आहे तर नवरात्रीच्या (Navratri) पहिल्या दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून सर्व धार्मिक स्थळे उघडली जातील. आणि 22 ऑक्टोबरपासून नाट्यगृहातही तिसरी घंटा ऐकायला मिळणार आहे. यासोबत आता कॉलेजही सुरु करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
घटनस्थापनेच्या मुहूर्तावर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे मंदिरावर उपजीविका करणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना आनंदाचे भरते आले आङे. देव नाही तर सरकार पावले अशी म्हणण्याची वेळ यांच्यावर आलीय कारण विस्कटलेली आर्थिक घडी सुधारेल असा विश्वास त्यांना वाटतोय.