Koyna Dam Rehabilitation Special Report: गावाला ना रस्ता, ना वीज;कोयना धरणग्रस्तांचं पुनर्वसन कधी?
Koyna Dam Rehabilitation Special Report: गावाला ना रस्ता, ना वीज;कोयना धरणग्रस्तांचं पुनर्वसन कधी? कोयना धरण... महाराष्ट्राची तहान भागवणारं धरण... वीजनिर्मितीतून महाराष्ट्राला प्रकाश देणारं धरण... मात्र याच धरणाचा शेजार लाभलेलं एक गाव मात्र दुर्दशेच्या अंधारात चाचपडतंय... तिथं ना वीज आहे... ना गावात जायला वाट... शाळेत जाणारी इवली इवली पोरं, जीव धोक्यात घालून, काट्याकुट्याची वाट तुडवत शाळा गाठतायत... नोकरी करणाऱ्यांचीही तीच गत... आता तर फक्त ठेच लागलेल्या माऊलीचा, वेळेत दवाखान्यात नेता न आल्यामुळे, जीव गेलाय... देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्ष झाली आणि धरण बांधून ५० वर्ष उलटून गेली... एक पिढी म्हातारीही झाली... तरी रस्ते, वीज, दवाखाना अशा सुविधा पोहोचत नसतील, तर मात्र यापेक्षा दुसरं दुर्दैव ते काय...
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























