Kanhaiya Kumar Jignesh Mewani join Congress : काँग्रेसची धुरा आता तरुणांच्या हाती? Special Report
Kanhaiya Kumar Joins Congress: जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी मंगळवारी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी, तिन्ही नेते दिल्ली येथील आयटीओ येथे शहीद भगतसिंग पार्कमध्ये जाऊन शहीद-ए-आझम भगतसिंग यांना श्रद्धांजली वाहिली. या तरुण नेत्यांसोबत एक फोटो शेअर करताना राहुल गांधी यांनी ट्वीट केले, "खोट्याच्या राज्यात सत्यानेच क्रांती येते. या सत्याग्रहात सर्व नवीन आणि जुन्या साथीदारांना एकत्र सहभागी व्हावे लागेल. #BhagatSingh"त्यानंतर कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी राहुल गांधींसह काँग्रेस कार्यालय गाठले. येथे कन्हैया कुमार यांनी पक्षाचे सदस्यत्व घेतले. कन्हैया यांनी राहुल गांधींना महात्मा गांधी, भीमराव आंबेडकर आणि भगतसिंग यांची फ्रेम भेट दिली.
काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल, पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि काँग्रेसचे बिहार प्रभारी भक्त चरण दास यांनी पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांचे स्वागत केले. वेणुगोपाल म्हणाले, "कन्हैया कुमार हे देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. त्यांच्या सामील होण्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल. जिग्नेश जी यांचा सहभाग पक्षाला बळकट करेल." कन्हैया कुमार म्हणाले की, कोट्यवधी तरुणांना असे वाटू लागले आहे की जर काँग्रेस टिकली नाही तर देशही टिकणार नाही आणि अशा परिस्थितीत ते लोकशाही बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. त्याचबरोबर ते म्हणाले की, देशात केवळ वैचारिक संघर्षाचे नेतृत्व काँग्रेसच करू शकते.