COVID Center Scam : कोविड घोटाळा, अडचणीत कोण कोण? Special Report
मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे सुमारे २० हजाराच्या वर बळी गेलेत. आताआता नव्या कोरोनाग्रस्तांची आणि कोरोनाबळींची संख्या तशी फार नाहीय. मात्र एक काळ असा होता की, रोज शेकडो, हजारो लोकांचे जीव जात होते... यात मनाला चटका लावणारी गोष्ट ही होती की, कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा मृतदेहही नातेवाईकांना दिला जात नव्हता... महापालिकाच अंतविधी करत असे... मात्र हे सगळं घडत असताना, याच मृतदेह ठेवण्याच्या बॉडीबॅगच्या खरेदीतून अनेकांनी मृतांच्या टाळूवरचं लोणी ओरपलंय... हे आम्ही नाही, तर खुद्द ईडीमधील सूत्रांनीच ही माहिती दिलीय... पाहूयात ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या भयानक काळात, कशी खाबुगिरी सुरू होती...
All Shows


































