Chhagan Bhujbal : भुजबळांसाठी केंद्राचा प्लॅन; मान की अपमान? Special report
छगन भुजबळांच्या नाराजीनाट्याचा पुढचा अंक आज पार पडला. पक्षाध्यक्ष अजित पवारांना भेटण्याआधीच भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फढणवीसांना भेटले. फडणवीसांनी त्यांना पुढचे काही दिवस वाट पाहण्याचा सल्ला दिला. भुजबळांनी तो सल्ला मान्यही केला. मात्र आजच्या या घटनाक्रमातून काही प्रश्न निर्माण झाले. याच प्रश्नांचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
मंत्रिमंडळात जागा न मिळाल्यामुळं बंडाचा झेंडा उगारलेल्या भुजबळांनी पक्षाध्यक्ष अजित पवारांना भेटण्याआधीच
थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.
गेल्या आठवड्यात आक्रमक असणाऱ्या भुजबळांना मुख्यमंत्र्यांनी काही दिवस थांबण्याचा सल्ला दिला..
हा सल्ला मान्य करत भुजबळांनीही आठ-दहा दिवस ब्रेक घेण्याचा निर्णय जाहीर केला.
छगन भुजबळांबाबत अजित पवार सविस्तर बोलतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी एका वाक्यात विषय संपवून टाकला.
जर भुजबळांबाबत जे उत्तर अजित पवारांकडून अपेक्षित होतं..
ते उत्तर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं..
त्यामुळं अजित पवारांच्या मनातली गोष्ट ते बोलण्याआधीच मुख्यमंत्र्यांना कशी समजली, याची चर्चा सुरु झाली.