Ajit Pawar CM Special Report :भुजबळ - मुंडे यांची घाई,अजितदादांची मनाई! मुख्यमंत्रिपदावरुन काय घडलं?
पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) राष्ट्रवादीचा युवा मिशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. आपल्याला विकासावर लक्ष द्यायचं आहे. (NCP)लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची धमक ज्यांच्यात असते तो खरा युवक असतो. आज जग बदलत आहे, आपल्याला हा आमूलाग्र बदल स्वीकारायला लागणार आहे, असा सल्ला अजित पवार यांनी यावेळी तरुणांना दिला. त्यासोबतच अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं स्वप्न आहे असं म्हणाऱ्यांचे अजित पवारांनी कान टोचले. जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री मुख्यमंत्री करू नका. आधी संघटन बांधू, ते मजबूत करू, असंही ते म्हणाले.
All Shows

































