Chandrashekhar Bawankule On Congress : काँग्रेसला फोडा, रिकामी करा, फोडाफोडी पार्ट 3 Special Report
Chandrashekhar Bawankule On Congress : काँग्रेसला फोडा, रिकामी करा, फोडाफोडी पार्ट 3 Special Report
२०१३ साली भाजपने काँग्रेसमुक्त भारतचा नारा दिला होता.. आता राज्यात नवा नारा भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिलाय. काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा असा कानमंत्र चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्याला काँग्रेसने आणि मविआने तिखट शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. महायुतीकडे २८८ पैकी २३७ आमदार असताना.. १३२ आमदार असलेल्या भाजपला, १६ आमदार शिल्लक असलेली काँग्रेस का रिकामी करायचीय असा प्रश्न विचारला जातोय. ..
काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा, असा कानमंत्र पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना बावनकुळेंनी दिला -..राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पडलेली उभी फूट आणि त्यानंतर या दोन्ही पक्षांची झालेली अवस्था काँग्रेस नेत्यांनी जवळून पाहिली आहे. त्यामुळे बावनकुळेंच्या ऑडियो क्लिपनंतर काँग्रेस नेते खडबडून जागे झाले. मविआमधील इतर दोन महत्वाचे पक्षांनी काँग्रेसच्या सूरात सूर मिसळला. भाजपमध्ये मूूळ भाजपचे किती नेते आहेत आणि इतर पक्षातून आलेले किती याचा हिशेबच संजय राऊतांनी मांडला. दरम्यान पक्षफोडीच्या विधानानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधला... काँग्रेस नेत्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही त्याला मी काय करणार असं बावनकुळे म्हणालेत... काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्यांकडून अपेक्षा नसल्याची टीकाही बावनकुळेंनी केली. कोणे एके काळी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी बावनकुळेंंच्या मताला दुजोरा दिला.
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























