Bageshwar Baba Daharmantar Special Report : बागेश्वर बाबांच्या दरबारात धर्मांतर, जमीरचा झाला शिवराम
त्रपती संभाजीनगर येथे श्री बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेच्या अहमदनगर येथील जमीर शेख यांच्या कुटुंबातील ९ सदस्यांनी बुधवारी शास्त्रींच्या हस्ते दीक्षा घेत हिंदू धर्मात प्रवेश केला...लहानपणापासून जमीर शेख यांना हिंदू रिवाजानुसार पूजापाठ करण्याची आवड होती... सनातन धर्मावरील श्रद्धेमुळे हे धर्मांतर करीत असल्याच्या भावना शेख यांनी व्यक्त केली... मजुरी काम करणारे जमीर शेख यांनी आपल्या दोन्ही मुलींची लग्ने हिंदू धर्मात करून दिल्याचेही त्यांनी सांगितले...अनेक दिवसांपासून त्यांना हिंदू धर्मात प्रवेश करायचा होता त्यासाठी काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमाबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी संपूर्ण कुटुंबासह हिंदू धर्मात प्रवेश केला... जमीर यांना पाच मुलीच होत्या. मुलगा होण्यासाठी श्रीकृृष्ण गोविंद हरे मुरारी…हे भजन गायले... कृष्णाला अभिषेकही केला...श्रावणात त्यांना मुलगा झाला. असं जमीर शेख आणि आताचे शिवराम आर्य सांगतात.
All Shows

































