Ambadas Danve vs Prasad Lad : हातवारे, शिवीगाळ, राजकीय संस्कृती गाळात? Special Report
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला तडा पाडणारे प्रकार घडलेयत... आताही अधिवेशनात भर सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चक्क अत्यंत घाणेरड्या शिव्या देत, विधिमंडळाच्या परंपरेला गालबोट लावलंय... आणि त्यावरून मोठा वाद निर्माण झालाय... पाहूयात...
Ambadas Danve, Mumbai : "माझा तोल सुटलेला नाही. माझ्यावर बोट केलं तर मला बोट तोडण्याचा अधिकार आहे. मी विरोध पक्षनेता नंतर आहे, आधी शिवसैनिक आहे", असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. विधानपरिषदेत अंबादास दानवे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अंबादास दानवे यांच्याकडून आज विधानपरिषदेत भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ देखील करण्यात आली.
बाटगा प्रसाद लाड मला हिंदूत्व शिकवणार आहे का? अंबादास दानवेंची टीका
अंबादास दानवे म्हणाले, बाटगा प्रसाद लाड मला हिंदूत्व शिकवणार आहे का? पक्षात धंद्यासाठी हा माणूस काम करतो. माझ्यावर बोट दाखवून बोलतो. सभापतींना बोल मला बोट का दाखवतो? तो कसा मला राजीनामा मागू शकतो? माझे पक्षप्रमुख निर्णय घेतील. राहुल गांधींचा विषय विधान परिषदेत का काढला? मला पश्चाताप नाही, माझा शिवसैनिक जागा झाला. माझ्यावर सुद्धा केसेस आहेत. हिंदुत्व साठी केसेस घेतल्या आहेत. हे शेपूट घालून पळणारे हिंदुत्ववादी आहेत, असंही दावने यावेळी बोलताना म्हणाले.