Ajit Pawar VS Sharad Pawar : पुतण्याचे नेते काकांच्या भेटीला, 'डर का माहोल' कुणाकडे? Special Report
Ajit Pawar VS Shard Pawar : पुतण्याचे नेते काकांच्या भेटीला, 'डर का माहोल' कुणाकडे? Special Report
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पडद्यामागून आपला भाऊ धैर्यशील मोहिते पाटील यांची सूत्रे हलवत माढा लोकसभा जिंकणारे फडणवीस यांचे निकटवर्तीय रणजीत सिंह मोहिते पाटील आता पुन्हा तुतारी घेऊन माढा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी डावल्याने त्यांनी तुतारी हातात घेत भाजपकडून हा मतदारसंघ खेचून घेतला होता. यावेळी भाजपने विधानपरिषद दिलेले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे उघडपणे प्रचारात कुठेही आले नसले तरी पडद्यामागून सूत्रे हालवत त्यांनी माढा व सोलापूर या दोन्ही जागा जिंकण्यास महाविकास आघाडीला मोलाचे सहकार्य केले होते. आता विधानसभेला रणजितसिंह मोहिते पाटील काय करणार याची चर्चा सुरू असतानाच अकलूज येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत काल झालेल्या मेळाव्यात रणजीत दादा नुसते स्टेजवरच नव्हते तर त्यांनी भाषण करून भाजपला जोरदार धक्का दिला.
अकलूज च्या कार्यक्रमात शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या कानात सातत्याने बोलणारे रणजीत दादा ज्या वेळेला भाषणाला उभारले त्या वेळेला सोलापूर जिल्ह्यासाठी आपण कोणतीही तडजोड करायला तयार आहोत असे स्पष्ट संकेत दिल्याने भाजपचे धाबे दणाणले आहे. रणजीत सिंह मोहिते पाटील हे 2019 साली लोकसभेची उमेदवारी डावल्याने भाजपमध्ये आली होती. मोहिते पाटलांमुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने माढा व सोलापूर या जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला होता. मात्र यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील आणि भाजपचे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बिनसले आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना तुतारी देऊन राष्ट्रवादीतून जिंकून आणले. आता विधानसभेच्या तोंडावर रणजितसिंह मोहिते पाटील हे उघडपणे महाविकास आघाडीच्या स्टेजवर आल्याने लवकरच ते फडणवीस व भाजपाला सोडचिठ्ठी देणार याचे संकेत दिले आहेत.
माढा विधानसभा जिंकणे हे 2004 पासून मोहिते पाटील गटाचे स्वप्न होते. आता यावेळी माढा विधानसभेतून रणजीत सिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास विद्यमान अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या अडचणी वाढणार आहेत. याचेच गणित शरद पवार सध्या मांडत असून त्यामुळेच काल झालेल्या कार्यक्रमात रणजीत सिंह मोहिते पाटील हे उघडपणे स्टेजवर आले आणि त्यांनी भाषणही केले. सध्या माढा विधानसभेसाठी इच्छुकांची मांदियाळी लागली असून हे बहुतांश इच्छुक उमेदवार अकलूजच्या कार्यक्रमाला हजर होते. या सर्वांसमोर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिलेले तडजोडीचे संकेत हे राष्ट्रवादी गटात प्रवेशाची नांदी असून तसे झाल्यास भाजपाला मोहिते पाटील घरातील उरलेल्या एकमेव सदस्याचा पाठिंबाही गमवावा लागणार आहे. यामुळे भाजप नेते आधीच अस्वस्थ असून अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी थेट मोहिते पाटील यांच्यावर टीका करताना सर्वात जास्त कामे मोहिते पाटील यांची फडणवीस यांनी केल्याचे आठवण करून देत जानी शरद पवारांवर घर फोडण्याचे आरोप केले तेच आता शरद पवारांच्या मागे फिरत असल्याचा टोला लगावला होता. मोहिते पाटील जाणार हे आता भाजपलाय उमगून चुकल्यामुळे मोहिते पाटलांना शह देण्यासाठी भाजपला नवीन विवहरचना करावी लागणार आहे. मोहिते पाटील यांच्या उपस्थितीबाबत भाजप किंवा फडणवीस यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी यामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजपला मोठा हादरा बसला आहे.