Ahmedabad Plane Crashमुंबईतील पायलटसह महाराष्ट्राच्या दोन लेकींचा विमान अपघातात मृत्यूSpecial Report
अहमदाबादहून लंडनकडे झेपावलेल्या विमानाला उड्डाणानंतर काहीच सेकंदात अपघात झाला. अपघाताची दृश्य पाहिली तर त्यातून कुणीच वाचलं नसेल याचा अंदाज येतो.. या अपघातग्रस्त विमानात महाराष्ट्रातील क्रू मेंबर्ससह नागपूरचे प्रवासी असल्याचं समोर आलंय.. पाहूया याचसंदर्भातला एक रिपोर्ट..
मुंबईतील पायलटसह महाराष्ट्राच्या दोन लेकींचा विमान अपघातात मृत्यू वेळ दुपारी दीड वाजता अहमदाबादहून लंडनकडे रवाना होण्यासाठी एअर इंडियाचं विमान सज्ज झालं एक पायलट, को पायलटसह १० क्रू मेंबर्स प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले नेहमीप्रमाणेच हे सर्व क्रू मेंबर्स आपल्या सेवेत दाखल झाले
दुसऱ्यांची मदत करण्याआधी आपला जीव वाचवा अशी सूचना देणाऱ्या या क्रू मेंबर्स मात्र प्रवास सुरु झाल्यापासून ते प्रवास संपेपर्यंत प्रत्येक प्रवाशाच्या सेवेत हजर असतात
आजही अशीच सेवा देण्यासाठी सर्व क्रू मेंबर्स सज्ज झाले पण नियतीच्या मनात काही औरच होतं विमानाच्या उड्डाणानंतर काहीच क्षणात विमान कोसळलं आणि होत्याचं नव्हतं झालं
१२ क्रू मेंबर्स २३०प्रवाशांना घेऊन लंडनकडे निघाले काही सेकंदात विमानाचा अपघात झाला या अपघातग्रस्त विमानात महाराष्ट्राच्या दोन लेकी होत्या
All Shows

































