Man Suddha Tuza : Majha Katta : मनाचा गुंता सोडवणारी मालिका, 'मन सुद्ध तुझं'ची टीम माझा कट्ट्यावर
Man Suddha Tuza : साहित्यावर आधारित मालिकांची निर्मिती करणारे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि लेखक प्रशांत दळवी यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोरोनाकाळात शारीरिक व्याधींनी लोक वैतागले होते पण अगदी प्रत्येकाने तितकाच मानसिक ताण सहन केला आहे. हे मानसिक तान वेगवेगळ्या प्रकारचे होते. शारीरिक व्याधी औषधाने बऱ्या होतात. पण मानसिक गुंता सोडवणं कधीकधी खूप कठीण होऊन बसतं. खरं तर उपाय खूप सोपा असतो पण मनुष्य स्वभाव, भावभावना, नात्यांमधली गुंतागुंत यांच्यामुळे समस्येचा तिढा इतका वाढतो की
प्रश्न डोंगराएवढे वाटू लागतात. अशाच घरोघरी आढळणाऱ्या मानसिक गुंतागुंतीची उकल करणारी अनोखी मालिका आहे "मन सुद्ध तुझं".
3 ऑक्टोबरपासून दर रविवारी सकाळी साडे दहा वाजता "मन सुद्ध तुझं" ही मालिका एबीपी माझावर प्रसारित होणार आहे. तर दर रविवारी रात्री 8 वाजता या मालिकेचे पुन:प्रक्षेपण होणार आहे. मानसिक आरोग्य या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आधारित मालिका पहिल्यांदाच एका वृत्तवाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. याचनिमित्ताने "मन सुद्ध तुझं"ची टीमशी गप्पा मारल्या आहेत माझा कट्ट्यावर.