Majha Katta Vikram Sathaye : सचिनच्या बॅटपासून सेहवागच्या शॉटपर्यंत, विक्रम साठ्येचे चौकार-षटकार
क्रिकेट आणि कॉमेडीचा संगम साधणारे विक्रम साठ्ये एबीपी माझाच्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात उपस्थित होते. क्रिकेट म्हणजे भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि भारतीय संघाचे क्रिकेटर्स जणू आपल्या जनतेसाठी देवच आहेत. त्यामुळे क्रिकेटवर कॉमेडी करणं कठीण असू शकलं असतं, पण विक्रम साठ्ये यांनी कॉमेडी ही केवळ मनोरंजन म्हणून करायची असं ठरवलं होतं. दिग्गज खेळाडूंसमोर त्यांच्याच नकला करणं, त्यांच्या चालण्याची शैली, त्यांची बोलण्या-वागण्याची पद्धत या सर्व गोष्टी स्टॅंडअप कॉमेडीच्या माध्यमातून सादर करतात. कुणी खेळाडू यावर नाराज झालाय का, किंवा चिडलाय का असं विचारलं असता विक्रम यांनी म्हटलं की कित्येक क्रिकेटर्सना विक्रमने केलेली नक्कल इतकी आवडते की त्यांना ती पुन्हा पुन्हा करायला सांगतात. खिलाडू वृत्ती असलेले हे खेळाडू कॉमेडीसुद्धा तशीच मनोरंजन म्हणून पाहतात आणि छान एंजॉय करतात!