Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 13 June 2024
पहिल्याच पावसात महाड तालुक्यातील खैरे गावात दरड कोसळली, एमआयडीसी परीसरात सुरु असलेल्या खोदकामामुळे दरड कोसळल्याचा ग्रामस्थांचा आरोप, परिसरात भीतीचं वातावरण.
बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथाळा इथल्या सरस्वती नदीला पूर, कोथळा ते सिरसाळ्याचा संपर्क तुटल्यानं नागरिकांचा जिवघेणा प्रवास.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची रिपरिप. हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट.
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी, पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहू लागली तर पारनेर शहरातील लोणी रस्त्यावर ओढ्याचं पाणी घरात शिरलं, संसारोपयोगी साहित्याचं नुकसान.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे केळीबाग उद्ध्वस्त. ब्राह्मणपुरी, सुलवाडा ,पिंपरी शिवारात केळी पिकांचं मोठं नुकसान. प्रशासनाच्या वतीनं पंचनामे न केल्यानं शेतकरी नाराज.
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस. पारनेर तालुक्यातही जोरदार पावसाची हजेरी. पारनेर शहरातील लोणी रोड परिसरातील घरात पाणी, नागरिकांची तारांबळ.
सिंधुदुर्ग जिल्हयात विजेच्या लपंडावानं नागरिक त्रस्त, समस्या मार्गी लावा, वैभव नाईक यांच्या महावितरण अधीक्षक अभियंत्यांना सूचना.
मान्सून सक्रीय होताच वाशिममध्ये शेतकऱ्यांची बी बियाणे खरेदीसाठी लगबग, शेतीसाठी लागणारे खुरपणी आणि इतर साहित्य घेण्यासाठीही बाजारपेठेत गर्दी.