(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WhatsApp : व्हॉट्सअॅप युजर्ससाठी आनंदवार्ता ! आता व्हॉट्सअॅपवर करता येणार ग्रुप काॅल शेड्युल
एक अनोखे फीचर्स व्हॉट्सअॅप युजर्स अपडेट करण्यात आले आहे. जे युजर्सना ग्रुप कॉल शेड्युल करण्यास मदत करणार आहे.
WhatsApp Group Call Schedule Feature : व्हॉट्सअॅप युजर्संसाठी नेहमीच विविध फीचर्स अपडेट करत असते. या नवीन अपडेटचा फायदा मेटाच्या सर्व वापरकर्त्यांना होतो. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपने स्क्रीन शेअर फीचर अपडेट केले होते. या फीचर मदतीने एकाच वेळी अनेक लोकांना स्क्रिन शेअर करता येणार होती. आता आणखीन एक अनोखे फिचर व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांकरता अपडेट करण्यात आले आहे. जे वापरकर्त्यांना ग्रुप कॉल शेड्युल करण्यास मदत करणार आहे. हे फीचर वापरकर्त्यांना अपकमिंग ग्रुप कॉल इव्हेंटबद्दल सर्व मेंबर्सना अलर्ट करते. कॉल शेड्यूल केल्यानंतर, कॉल सुरू होण्यापूर्वी 15 मिनिटे आधी मेसेजद्वारे सदस्यांना त्याची माहिती मिळेल. कॉल शेड्यूल करताना, तुम्ही त्याचा विषय, वेळ, तारीख आणि कॉल प्रकार (व्हिडिओ किंवा ऑडिओ) निवडू शकता.
काय होते स्क्रिन शेअरिंग फिचर
'शेअर' आयकॉनवर टॅप करून किंवा क्लिक करून व्हॉट्सअॅपवर स्क्रीन शेअरिंग करता येते, असं मार्क झुकरबर्ग यांचं म्हणणे होते. सर्व प्रथम वापरकर्त्यांना त्यांचे व्हॉट्स अॅप उघडावे लागेल. यानंतर, तुमच्या कोणत्याही संपर्कासह व्हिडिओ कॉल सुरू करा. व्हिडिओ कॉल दरम्यान, फीचरच्या तळाशी तुम्हाला स्क्रीन शेअरिंग आयकॉन दिसेल. यानंतर, तुम्हाला स्क्रीन शेअर करायची असल्यास कन्फर्म करा. तुम्ही कन्फर्म करताच, तुम्ही ज्या व्यक्तीसोबत व्हिडिओ कॉल करत आहात त्या व्यक्तीसोबत तुमचे स्क्रीन शेअरिंग सुरू होईल. याशिवाय, तुम्ही स्टॉप शेअरिंगवर क्लिक करून कधीही स्क्रीन शेअरिंग थांबवू शकता.
नोव्हेंबर 2016 मध्ये व्हिडीओ कॉलिंग सुरू झाले
व्हिडीओ कॉलिंग हे WhatsApp वर गेल्या सहा वर्षांहून म्हणजेच नोव्हेंबर 2016 पासून अपडेटेड आहे. अलीकडच्या काळात व्हॉट्सअॅप सतत नवनवीन फीचर्स जोडत आहे. आपली सेवा अधिक सुधारत आहे. कंपनीने अलीकडेच WhatsApp iOS वर व्हिडीओ कॉलसाठी पिक्चर-इन-पिक्चर सपोर्ट आणलं आहे.
WhatsApp या फिचरवर करत आहे काम
WhatsApp अनेक फिचरवर काम करत आहे. त्यामध्ये यूजरनेम, अॅडमिन रीव्ह्यू, Passkey, ईमेल लिंक इत्यादीचा समावेश आहे. युजरनेम फीचर सुरू केल्यानंतर, प्रत्येकाला स्वतःचे वेगळे युजरनेम सेट करावे लागेल, जसे सध्या इंस्टाग्राम आणि ट्विटरमध्ये आहे. युजरनेमच्या मदतीने तुम्ही इतरांनाही तुमच्या व्हॉट्सअॅपवर जोडू शकता. म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा इतरांना नंबर देण्याची गरज नाही. WhatsApp व्यतिरिक्त, Meta ने थ्रेड्ससाठी नवीन अपडेट्स देखील जारी केले आहेत.