WhatsApp Call Recording : आता व्हॉट्सअप कॉलही करता येतील रेकॉर्ड; 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करा
WhatsApp Call Recording : अॅन्ड्रोईड आणि आयओएस डिव्हाईसमध्ये व्हॉट्सअप कॉल रेकॉर्ड करण्याची सोपी पद्धत जाणून घेऊयात.
WhatsApp Call Recording : टेक्नॉलॉजीच्या (Technology) वाढत्या युगात अनेक गोष्टी अॅडव्हान्स होत चालल्या आहेत. यामध्ये व्हॉट्सअपही (WhatsApp) कुठे मागे नाही. व्हॉट्सअप सतत आपल्या ग्राहकांसाठी नवीन अपडेट घेऊन येत असतात. आपण पाहिलं असेल की आजकाल अनेक लोक व्हॉट्सअपच्या माध्यमातून कॉल करणं पसंत करतात. याच गोष्टीला धरून आता व्हॉट्सअपने ही सुविधा आणखी अॅडव्हान्स केली आहे. आतापर्यंत आपण कॉलवर रेकॉर्डिंग करू शकत होतो पण आता व्हॉट्सअपवर देखील कॉल रेकॉर्ड करता येणार आहे. अॅन्ड्रोईड आणि आयओएस डिव्हाईसमध्ये व्हॉट्सअप कॉल रेकॉर्ड करण्याची सोपी पद्धत जाणून घेऊयात.
अॅन्ड्रोईड स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअप Voice Call कसा रेकॉर्ड करावा?
सर्वात आधी गुगल प्ले स्टोअर ओपन करा. या ठिकाणी Call Recorder:Cube ACR" अॅप सर्च करा.
आता या अॅपला डाऊनलोड करून आपल्या फोनमध्ये ओपन करा.
आता व्हॉट्सअपमध्ये जाऊन तुमच्या कोणत्याही मित्र-मैत्रीणीला कॉल करा किंवा कॉल रिसीव्ह करा.
कॉलिंगच्या दरम्यान तुम्हाला या नावाचा एक विडजेट दिसेल. जर तुम्हाला स्क्रिनवर हा ऑप्शन दिसत नसेल तर Cube Call अॅप ओपन करा आणि नंतर Voice Call साठी "Force VoIP Call" ऑप्शन सिलेक्ट करा.
त्यानंतर हे अॅप आपोआप व्हॉट्सअप व्हॉईस कॉल रेकॉर्ड करण्यास सुरुवात करेल. आणि त्या ऑडिओ फाईलला तुमच्या डिव्हाईसच्या इंटर्नल मेमरीमध्ये सेव्ह करेल.
आयफोनमध्ये व्हॉट्सॲप Voice Call कसा रेकॉर्ड करायचा?
यासाठी, सर्वात आधी तुम्हाला तुमच्या Mac मध्ये QuickTime ॲप डाऊनलोड करावं लागेल.
आता तुमचा आयफोन मॅकशी कनेक्ट करा आणि नंतर QuickTime ॲप ओपन करा.
"File" ऑप्शनवर जा आणि "New Audio Recording" ऑप्शन सिलेक्ट करा.
आता रेकॉर्डिंग डिव्हाईस म्हणून तुमचा iPhone सिलेक्ट करा आणि QuickTime ॲपमध्ये Record ऑप्शन सिलेक्ट करा.
आता आयफोनवरून व्हॉट्सॲप कॉल करा आणि ॲड यूजर आयकॉनवर क्लिक करा.
आता ज्या व्यक्तीचा कॉल तुम्हाला रेकॉर्ड करायचा आहे त्या व्यक्तीला कॉल करा. तुमचा Voice Call आपोआप रेकॉर्ड केला जाईल आणि त्याची ऑडिओ फाईल तुमच्या Mac वर सेव्ह केली जाईल.
'या' गोष्टीची विशेष काळजी घ्या
या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की, कोणाचाही कॉल रेकॉर्ड करणं हे कायदेशीर असेलच असं नाही. तसचे, कोणाचाही कॉल रेकॉर्ड करण्यापूर्वी तुमच्या राज्याचे नियम आणि कायदे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला याची खात्री नसेल तर कोणाचाही कॉल रेकॉर्ड करण्यापूर्वी त्यांची परवानगी नक्कीच घ्या.
महत्त्वाच्या बातम्या :