स्वस्तात iPhone हवाय? या मॉडेलवर मिळतोय डिस्काऊंट, 5 कलर ऑप्शन उपलब्ध
iPhone 13: जर तुम्हाला आयफोन स्वस्तात विकत घ्यायचा असेल, तर या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबई : तुम्ही Apple चा iPhone 13 50,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेऊ शकता. ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर iPhone 13 च्या 128GB मॉडेलवर मोठी सूट दिली जात आहे.हे मॉडेल तुम्ही फक्त 49,999 रुपयांना खरेदी करू शकता. iPhone 13 मध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप, 6.1 इंच स्क्रीन आणि 6 कलर पर्याय मिळतात. कंपनीने iPhone 13 69,990 रुपयांना लॉन्च केला आहे. पहिल्यांदाच हे मॉडेल इतक्या स्वस्त किमतीत लिस्ट करण्यात आले आहे. Amazon वर SBI क्रेडिट कार्डवर 1,000 रुपयांची बँक सूटही दिली जात आहे. डिस्काउंटनंतर फोनची किंमत 48,999 रुपये राहिली आहे.
याशिवाय मोबाईल फोनवर 41,250 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंटही दिला जात आहे. जर तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असेल तर तुम्हाला 6 ते 8 हजार रुपयांची सूट सहज मिळू शकते. तुमच्याकडे प्रीमियम फोन असल्यास त्याची किंमत जास्त असू शकते. अशा प्रकारे तुम्ही आयफोन 13 अतिशय स्वस्तात तुमचा बनवू शकता. आजपासून Amazon वर ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरु झाला आहे, ज्यामध्ये विविध वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे.
या अँड्रॉइड फोन्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट
आयफोनशिवाय अॅमेझॉनवर अँड्रॉईड फोनवरही भरघोस सूट दिली जात आहे. Oneplus Nord Ce 3 Lite फोन तुम्ही Rs 18,999 मध्ये खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे Redmi 12 5G 11,999 रुपयांना विकला जात आहे. तसे, त्याची किंमत 12,999 रुपये आहे. या फोनमध्ये तुम्हाला Snapdragon 4 Gen 2 चिपसेट मिळत आहे. तुम्ही Samsung चा S23 5G 64,999 रुपयांऐवजी 54,999 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्ही Amazon वरून Realme narzo 60x 5G रु. 11,499 मध्ये ऑर्डर करू शकता. स्मार्टफोन व्यतिरिक्त, इलेक्ट्रॉनिक्स, स्वयंपाकघरातील वस्तू आणि इतर आवश्यक घरगुती वस्तूंवरही भरघोस सूट दिली जात आहे.
दरवर्षी जानेवारी महिना येताच लोक Republic Day Saleची वाट पाहू लागतात. यानिमित्ताने भारतातील अनेक ई-कॉमर्स कंपन्या ऑनलाइन सेल सुरु करतात. ज्यामध्ये स्मार्टफोनसह सर्व प्रकारच्या प्रॉडक्टवर आणि सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सूट दिली जाते. या सेलची सगळेच वाट बघतात आणि लाखो लोक या सेलमधून अनेक वस्तू खरेदी करत असतात. या काही दिवसांच्या सेलमध्ये लाखो रुपयांची खरेदी भारतीय करत असतात.