Twitter CEO : एलॉन मस्क यांचा कुत्रा ट्विटरचा नवा CEO; दिमाखात खुर्चीवर बसलेला फोटो ट्वीट, केली 'ही' नवी घोषणा
Elon Musk Tweet : एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या नव्या CEO ची घोषणा केली आहे. ट्विटरचा नवा CEO कुणी व्यक्ती नसून मस्क यांचा कुत्रा आहे. नव्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
Elon Musk Announced New Twitter CEO : जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि ट्विटरचे (Twitter) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरच्या नव्या CEO ची म्हणजेच, मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) ची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, ट्विटर कंपनीचा (Twitter Company) नवा सीईओ कुणीही व्यक्ती नसून हा एक कुत्रा आहे. ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या नव्या सीईओचा फोटो पोस्ट करत ट्वीट केलं आहे. मस्क यांनी त्यांचा पाळीव कुत्रा फ्लोकी (Floki Shiba Inu) ट्विटरचा नवा सीईओ असल्याचं ट्वीट केलं आहे.
एलॉन मस्क यांचं ट्वीट चर्चेत
मस्क यांनी त्यांचा लाडका कुत्रा फ्लोकीचा CEO च्या खूर्चीवर बसलेला फोटो शेअर करत ट्वीट केलं आहे. एलॉन मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, ट्विटरचा नवीन सीईओ फार चांगला आहे. इतकंच नाही तर मस्क यांनी फ्लोकी इतर माणसांपेक्षा चांगला असल्याचं म्हटलं आहे.
एलॉन मस्क यांचा कुत्रा ट्विटरचा नवा CEO
The new CEO of Twitter is amazing pic.twitter.com/yBqWFUDIQH
— Elon Musk (@elonmusk) February 15, 2023
मस्क यांनी दुसरा फोटो ट्वीट करत ट्विटरच्या नव्या सीईओच्या स्टाईलचं कौतुक केलं आहे. फ्लोकीची स्टाईल भारी असल्याचं मस्क यांनी म्हटलं आहे. मस्क यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. अनेक युजर्सनी या फोटोला लाईक आणि शेअर तसेच रिट्विटही केलं आहे. युजर्स कमेंट करत फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एलॉन मस्क ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. मस्क नेहमी असे गंमतीशीर ट्वीट करत असतात. त्यामुळे नेटकरी मस्क यांच्या खोडकर शैलीत ट्वीटची मजा घेताना दिसत आहेत.
44 अब्ज डॉलरची ट्विटर डील
And has 🔥🔥 style pic.twitter.com/9rcEtu9w1Z
— Elon Musk (@elonmusk) February 15, 2023
अंतराळ संशोधन कंपनी स्पेसएक्स (SpaceX) आणि कार निर्माती कंपनी टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर कंपनी विकत घेतली. काही महिन्यांपूर्वीच हा वादग्रस्त ठरलेला करार पूर्ण झाला. मस्क यांनी 44 अब्ज डॉलर किमतीला ही ट्विटर डील पूर्ण केली. ट्विटर डील होणार ही माहिती समोर आल्यापासूनच हा करार प्रचंड चर्चेत होता. दरम्यान, काही वादामुळे ट्विटर डील तुटल्याचंही समोर आलं होतं. त्यानंतर ट्विटर आणि एलॉन मस्क यांच्या सामंजस्यानंतर हा करार पूर्ण झाला.
ट्विटरची मालकी मिळताच एलॉन मस्क यांनी कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. मस्क यांनी कंपनीचे कायदेशीर सल्लागार प्रमुख (Legal Head) विजया गड्डे (Vijaya Gadda) आणि CFO नेल सेगल (Nel Segal) यांनाही कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Twitter Blue : भारतातील यूजर्ससाठी ब्लू टिक व्हेरिफिकेशन सुरु, किती मोजावी लागेल किंमत? वाचा सविस्तर