America: देव तारी त्याला कोण मारी! 300 फूट खोल दरीत गाडी कोसळल्यानंतर कुटुंब सुखरूप, धक्कादायक माहिती समोर
California Tesla driver: अपघाचाताची चौकशी झाल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. पटेल कुटुंबीयांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
California Highway Patrol: कॅलिफोर्नियाच्या डेविल्स स्लाईड भागात एक कार अपघात झाला आणि सुरु बचावकार्य झाले. सुदैवाने या अपघातातून चारहीजण बचावले. मात्र या अपघाताची खोलवर जावून चौकशी केली असता हा अपघात नसून आत्महत्येचा प्रयत्न असल्याचं समोर आलं.
नेमकं काय घडलं?
कॅलिफोर्नियात राहणारे 41 वर्षीय डॉक्टर धर्मेश पटेल यांना चार वर्षांची मुलगी आणि नऊ वर्षांचा मुलगा आहे. धर्मेश यांनी दोन्ही मुलं आणि पत्नीसह आत्महत्येचा प्लॅन केला. त्यासाठी त्यांनी कॅलिफोर्नियाच्या डेविल्स स्लाईड टेकडीची निवड केली. कारण तिथून पडलेली व्यक्ती वाचत नाही असाच या टेकडीला इतिहास आहे. म्हणून आपल्या टेस्ला गाडीत धर्मेश संपूर्ण कुटुंबासह टेकडीवर पोहोचले आणि अत्यंत वेगानं गाडी दरीत कोसळली. तब्बल 250 ते 300 फूट खोल दरीत गाडी पडली.
अपघाताच्या चौकशीनंतर धक्कादायक माहिती समोर
एका बाजूला टेकडीचा भाग तर दुसऱ्या बाजूला खवळणारा समुद्र त्यामुळे इथं मृत्यू अटळ होता. स्थानिकांनी दरीत गाडी पडताना पाहिले आणि पेट्रोलिंग पोलिसांना कळवलं. पोलिसांना माहिती मिळताच बचावकार्य सुरु झालं. पोलिसांनी हायवेवरची वाहतूक धमी केली. तर दुसरीकडे बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर्सही पोहोचले. बचाव पथकाने गाडीतून आधी मुलांना आणि नंतर पटेल दाम्पत्याला बाहेर काढलं. त्यानंतर तिथून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आणि उपचार सुरु झाले. उपचार सुरू झाल्यानंतर अपघाताची चौकशी झाली.
This afternoon, deputies responded to a solo vehicle over the side of Hwy 1 south of the Tom Lantos tunnel. Two adults suffered non-life threatening injuries and two children were unharmed. Tremendous collaborative effort btwn SMSO, @CHP_GoldenGate and @calfireSCU pic.twitter.com/sVyKp6LSrc
— San Mateo County S.O (@SMCSheriff) January 3, 2023
कॅलिफोर्नियाच्या इतिहासात चमत्कार
अपघाचाताची चौकशी झाल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. पटेल कुटुंबीयांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी धर्मेश पटेल यांच्यावर पत्नी आणि मुलांच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर धर्मेश पटेल यांना तुरुंगात रवाना करण्यात येणार आहे. पण, ही घटना कॅलिफोर्नियाच्या इतिहासात चमत्कार म्हणून पाहिली जात आहे. कारण, डेव्हिल्स स्लाईडवरुन पडले आणि बचावले गेल्याची ही पहिलीच घटना असावी