आयमेसेज कॅमेरा इंटिग्रेशन, बबल इफेक्ट, लिंक प्रीव्ह्यू यांसारखे फीचर्स IOS 10 मध्ये अॅड करण्यात येणार आहेत.
2/6
अॅपल न्यूजः IOS 10 च्या अपडेटमध्ये अॅपल न्यूज आता स्क्रिन लॉक असतानाही वाचता येणार आहे.
3/6
इमोजीः IOS 10 मध्ये अॅपल फोनचे इमोजी बदलण्यात येणार आहेत. शिवाय स्क्रिनवर व्हर्चुअल फुग्यांचं अॅनिमेशन असणार आहे.
4/6
फोटोः IOS 10 च्या अपडेटमध्ये फोटो अॅप अजूनच खास होणार आहे. फोटोच्या अॅपमध्ये आता ऑब्जेक्ट, सीन रिकॉग्निशन आणि फेशिलच्या फीचर्ससह विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत.
5/6
व्हॉईस कमांडः IOS 10 कडून देण्यात आलेल्या सिरी या व्हर्चुअल असिस्टंट अॅपच्या माध्यमातून अॅपल युजर्स iPhone, MacBook वर फाईल सर्च करण्याव्यतिरिक्त इतरही कामं करु शकणार आहेत. व्हॉईस कमांडमुळे अॅपल ऑपरेटिंग अधिकचं सोपं होणार आहे.
6/6
अॅपलची नवीन ऑपरेटींग सिस्टीम IOS 10 चा खुलासा WWDC 2016 या कार्यक्रमात करण्यात आला आहे. ही अपडेट अॅपलची ओळख बदलणारी असणार आहे. यामध्ये आकर्षक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. अॅपलची ही नवीन अपडेट या वर्षाच्या शेवटपर्यंत उपलब्ध होणार आहे.